घंटागाडी ठेकेदाराला मुदतवाढ; शिवसेना आक्रमक

घंटागाडी ठेकेदाराला मुदतवाढ; शिवसेना आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घंटागाडी ठेक्यातील संशयास्पद बाबीबाबत मनपा (Nashik NMC) प्रशासनातर्फे वस्तुस्थिती दर्शक लेखी खुलासा करावा, अशी मागणी शिवसेना गटनेते विलास शिंदे (Vilas Shinde), महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) तसेच विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक झाली असून महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे.,..

नाशिक महानगरपालिका हद्दीतील केरकचरा घंटागाडीद्वारे वाहून नेण्याच्या निविदेचा प्रस्ताव हा जादा विषयात आणला गेला होता व शिवसेना (Shivsena) पक्षाचा विरोध डावलून सत्ताधारी पक्षाने तो मंजूरदेखील केला आहे.

महापौरांनी निविदेच्या रकमेबाबत आक्षेप निर्माण झाल्याने व निविदेची ३५४ कोटी ही रक्कम ढोबळमानाने काढल्याचे निर्दशनास आल्याने याबाबत तज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत काहीच कार्यवाही न करता प्रशासनामार्फत थेट निविदा काढण्यात आली, असा आरोप करण्यात आला.

नुकतेच शिवसेना युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पर्यावरणपूरक वाहने शासकीय व निमशासकीय संस्थानी खरेदी करण्याचे धोरण निर्गमित केले आहे. तथापी मनपा प्रशासनाने निविदेत काही घंटागाडया या सीएनजी (CNG) व इलेक्ट्रिक (Electric) स्वरुपात असाव्यात अशा स्वरुपाची यापूर्वी नमूद केलेली अट दि. १६/१२/२०२१ रोजी अचानक काढून टाकली व इतर अटी शर्ती बदलण्यासाठी महासभेची कुठलीही मान्यता घेतली गेली नाही.

तसेच निविदेला सुमारे २ वेळेला मुदतवाढ (Extension) दिल्यानंतर अनेक निविदा धारकांनी यामध्ये होकार दिल्याने ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आली. अचानक सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनी (Corporator) निविदा प्रक्रिया (Tender process) रद्द करून जुन्या मक्तेदाराला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

या सर्व बाबी संशयास्पद अनाकलनीय आहे, असे शिवसेना नेत्यांनी सांगितले. तरी सर्व संशयास्पद बाबीबाबत प्रशासनाची भूमिका काय आहे व निविदेचे भवितव्य काय राहील याबाबत प्रशासनातर्फे वस्तुस्थितीदर्शक खुलासा लेखी स्वरूपात करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com