शिवसेनेने राणेंना दोनदा धूळ चारली

विरोधी पक्षनेते दानवे यांचा घणाघात
शिवसेनेने राणेंना दोनदा धूळ चारली

मनमाड । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाला शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी चोखपणे उत्तर दिले असून उद्धव ठाकरे यांच्यामुळे राणे मुख्यमंत्री झाले त्यांनी उद्धव ठाकरे यांना जास्त शिकविण्याची गरज नाही.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना दोन वेळा पाडलं,त्यांच्या मुलाला लोकसभेत पाडलं..जो जामीनावर सुटला आहे ज्याचे कोर्टाने घर पाडण्याचा आदेश दिला आहे त्याने शिवसेनेला शिकविण्याची भाषा करू नये असे खरमरीत उत्तर शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाला दिले.

शहर शिवसेने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्या साठी दानवे मनमाडला आले होते यावेळी पत्रकारा सोबत संवाद साधला.यावेळी दानवे यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका करताना म्हणाले कि सध्या राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून उभी पिके नष्ट झाली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला असताना त्याला अद्यापही मदत मिळालेली नाही.ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने सरसकट पंचनामे करून बळीराजाला मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना बोनस देण्याची मागणी केली होती आत ते सत्तेत तर आलेच शिवाय त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देखील असल्यामुळे त्यांनी आता पोलिसांना बोनस द्यावा अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे.भाजपावर हल्लाबोल करताना .दानवे म्हणाले कि भारतीय जनता पार्टी म्हणते कि शिवसेना संपली आहे मात्र त्यांनी शिवसेनेतून आमदार फोडले,त्यांना मनसेची मदत घ्यावी लागते, दिल्लीची ताकत आणावी लागते त्यामुळे शिवसेना संपली नाही तर जिंकली आहे असे ही दानवे यांनी सांगितले

दानवे यांनी शासकीय विश्राम गृहावर अधिकार्‍यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर पल्लवी मंगल कार्यलयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक निवडणूक भगवा फडकविण्यासाठी तयार रहावे असे आवाहन केले.

यावेळी मंचावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे,उपसंपर्क प्रमुख अल्ताफ खान,ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक,आमदार नरेंद्र दराडे,माजी आमदार राजेंद्र देशमुख,उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद,तालुका प्रमुख संतोष गुप्ता, शहर प्रमुख माधव शेलार,माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनेच्या वतीने .दानवे यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला.संयोजन शहर प्रमुख माधव शेलार,विनय आहेर.प्रमोद पाचोरकर,संजय कटारिया,कैलाश गवळी,स्वराज देशमुख,प्रमोद पाचोरकर,सनी फसाटे,शैलेश सोनवणे,कायम शेख,प्रवीण सूर्यवंशी,संतोष जगताप,खालिद शेख,ययांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com