शिवसेना - भाजपचे वेगवेगळे रास्ता रोको आंदोलन

खराब रस्ता प्रश्नी कार्यकर्ते रस्त्यावर
शिवसेना - भाजपचे वेगवेगळे रास्ता रोको  आंदोलन

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुका (dindori taluka) शिवसेनेच्या (shiv sena) वतीने तालुक्यातील खराब रस्त्यांच्या प्रश्नी तीव्र आंदोलन (movement) छेडण्यात आले. एक तास रास्ता रोको आंदोलन झाले. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती.

दिंडोरी तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची दुरावस्था (poor road) झालेली आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील पाटील स्थानिक लोकप्रतिनिधींवर टिका केली.

दिंडोरी शहरातील आणि तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड वाताहात झाली आहे. एकाही रस्त्याने आपल्याला वाहने (vehicles) चालवता येत नाही. ठाकरे सरकार प्रचंड कामे करीत असताना दिंडोरीला निधी (Fund) आणता येत नसेल तर आम्ही लोकप्रतिनिधींचा निषेध करीत आहोत, असे पाटील म्हणाले. यावेळी माजी आमदार धनराज महाले यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar) यांनीही तीन वर्षात कोणतेही भरीव कामे दिंडोरी तालुक्यात केली नसल्याची टिका केली. विद्यमान आमदार (mla), खासदार (mp) तालुक्याच्या विकासाला कमी पडत असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी सांगितले की, तालुक्याला ठाकरे सरकारमध्ये विधानसभा उपाध्यक्ष पद मिळाले असताना तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बघता कोणताही फायदा तालुक्याला झालेला नाही. प्रत्येक प्रवाशाला नाचत नाचतच तालुक्यात प्रवास करावा लागतो. इतकी दयनिय अवस्था रस्त्यांची झालेली आहे. उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे रस्ता दुरुस्ती व विकासकामांसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी प्रवीण जाधव यांनीही पूर्व भागातील रस्त्यांची कैफियत मांडली.

सुरेश डोखळे यांनी कादवा कारखाना परिसरातील रस्त्यांची दुरावस्था मांडली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, माकप तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त करुन लोकप्रतिनिधींवर टिका केली. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. बांधकाम विभागाचे अधिकारी धनंजय देशमुख यांनी लवकरच दिंडोरी - पालखेड, मोहाडी विमानतळ, लखमापूर फाटा, कादवा कारखाना आदी परिसरातील रस्त्यांची कामे सुरु करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सदाशिव गावीत, नीलेश शिंदे, नारायण राजगुरु, शैलाताई उफाडे, नाना मोरे, कैलास पाटील, शिवराज गोडसे, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, सचिन देशमुख, वैभव महाले, सुनील मातेरे, राकेश शिंदे, बाळासाहेब नाठे आदी उपस्थित होते.

शिवसेना - भाजप संघर्ष

दिंडोरी शहरात रास्ता रोको आंदोलनातही राज्य व केंद्र सरकारप्रमाणे (State and Central Government) शिवसेना (shiv sena) - भाजप (bjp) संघर्ष दिसून आला. दिंडोरी तालुक्यातील रस्ता प्रश्नी शिवसेनेने व भाजपाने वेगवेगळे रास्ता रोको केले. दिंडोरी पंचायत समितीच्या आवारातून शिवसेना, भाजप, काँग्रेस (congress) कार्यकर्ते एकत्रित निघाले खरे परंतू शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी भाजपाला बरोबर घेऊन आंदोलनास करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या आंदोलनासमोरच रास्ता रोको आंदोलन केले.

काँग्रेसने आंदोलनात सहभाग घेतला नाही. माकपचे तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सुनील पाटील यांनी भाजप नेत्याशी सहकार संबंध असले तरी पक्ष पातळीवर आदेश महत्त्वाचा असल्याचे सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी विकासाच्या मुद्यावर भाजप आंदोलन करीत असल्याचे सांगितले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड व पदाधिकारी आंदोलनापासून दुर राहिले.

दिंडोरी शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने खराब रस्त्यांच्या विरोधात व सत्ताधार्‍यांच्या कार्यपद्धती विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव व प्रमोदशेठ देशमुख यांनी सांगितले की, यापुढे रस्त्यांच्या कामात अनियमितता व भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी दत्तात्रय जाधव, तुषार वाघमारे, काका देशमुख, रणजित देशमुख, शामराव मुरकुटे, भास्करराव कराटे, निलेश गायकवाड, अमरसिंह राजे, धीरज चव्हाण, मंगला शिंदे, संजय कदम, मयूर चव्हाण, दिलीप बोरस्ते, बाबूशेठ मणियार, वाहिद मणियार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com