रस्ते खडी व डांबर टाकून बुजवा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी

रस्ते खडी व डांबर टाकून बुजवा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रभाग क्रमांक ३० मधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील (main and internal roads) खड्डे (potholes) खडी व डांबर (Gravel and asphalt) टाकून बुजवावेत,

अशी मागणी शिवसेना (shiv sena), सत्कार्य फाउंडेशनने (Satakarya Foundation) केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांना याबाबतचे निवेदन (memorandum) देण्यात आले.

नवीन नाशिकमधील (navin nashik) जुना प्रभाग क्रमांक २४, नवीन रचनेनंतरचा प्रभाग क्रमांक ३० मध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या माती, मुरूम व खडीने खड्डे बुजविले जात आहेत. ही तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे.

आवश्यकता असलेल्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करावे, सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर, बाजीरावनगरमधील आर डी सर्कल ते मिलिंदनगर पूल, उंटवाडी गाव ते कालिका पार्क, कर्मयोगीनगरमधील नयनतारा इमारत ते बडदेनगर या मुख्य रस्त्यांवरील खड्डेही डांबर व खडीने बुजवावेत.

कर्मयोगीनगर, बाजीरावनगर, तिडकेनगर, सद्गुरूनगर, काशिकोनगर, कोठावदे मळा, कालिका पार्क, बडदेनगर, शिवाजी चौक , जगतापनगर, कालिकानगर, गोविंदनगरसह प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डेही डांबर व खडीने बुजवावेत,

अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, डॉ. शशीकांत मोरे, संकेत गायकवाड आदींसह रहिवाशांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com