अवैध इमारतींवरील शास्तीवरून शिवसेना आक्रमक

अवैध इमारतींवरील शास्तीवरून शिवसेना आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील निवासी किंवा अनिवासी अवैध इमारतींवरील illegal buildings शास्तीचा विषय महासभेत चर्चेसाठी आल्यावर विरोधकांसह सत्ताधार्‍यांनी विरोध केल्याने हा विषय महापौरांनी Mayor तहकूब केल्याचे जाहीर केले.

नाशिक महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी शहरातील अवैध इमारतींवरील शास्ती बाबतच्या विषयाच्या चर्चेप्रसंगी शिवसेनेने शहरात चार पट घरपट्टी लागू केल्याचे उघडकीस आणल्याने विरोधक आक्रमक झाले. सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी या विषयावरुन विविधकर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावर उत्तर देताना मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले की, सदर विषय नागरिकांच्या हितासाठी आहे.

अनेक नागरिकांना घरपट्टी अद्याप लागू झाली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून मनपाने सर्वेक्षण करून गेल्या 20 वर्षापासून न लागलेली घरपट्टी लागू करण्यात आल्याचे सांगितले. महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न यामुळे वाढल्याचे ही त्यांनी सांगितले. येत्या मार्च महिन्यापर्यंत अशीच वसुली 100 कोटी पर्यंत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनीकडून माहिती घेऊन मनपाकडे असलेल्या नकाशाच्या आधारे घरपट्टी लागू करण्यात येणार आहे.

ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी घरपट्टी काय दराने लावण्यात आली? याची माहिती विचारली. त्यावेळी शहरात निवासी व अनिवासी मिळकतीवर सुमारे चार पट घरपट्टी अधिक झाली असल्याचे समोर आले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात ही वाढ झाली आहे. त्यावेळी संपूर्ण सभागृहाने विरोध केला असतांनाही हा विषय लागू कसा केला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याचबरोबर घरपट्टीच्या दराबाबत याचिका न्यायालयात प्रलंबित असताना सुद्धा प्रशासनाने हा विषय चर्चेसाठी ठेवलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

या विषयावरून झालेल्या चर्चेवरुन हा विषय प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, भाजपाचे जगदीश पाटील यांनी सहभाग घेतला होता.

विद्युत विभागाचे उपअभियंता वनमाळी यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला होता. या अर्जाचा विचार करून महासभेने या अर्जाला मंजुरी दिली. मात्र यावेळी नगरसेवक गजानन शेलार यांनी वनमाळी यांची बढती असल्याने त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी विचार करावा असे सुचवले. सध्या मनपा कडे अपुरे सेवक संख्या असल्याने मानधनावर भरतीसाठी विशेष महासभा घेणार असल्याचे महापौर सतिष कुलकर्णी यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेत 2013 पासून अधिकारी व सेवकांची पदोन्नतीच झालेली नव्हती.

यासाठी वारंवार कर्मचारी संघटनांसोबतच नगरसेवकांकडून आवाज उठवण्यात येत होता. गेल्या आठवड्यात तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांची पदोन्नती जाहीर करण्यात आल्यानंतर आज महासभेत पदोन्नतीला मंजुरी देण्यात आली. दरम्यान यावेळी पदोन्नतीत काही अधिकार्‍यांवर अन्याय झाला असल्याचे नगरसेवकांनी लक्षात आणून दिले असले तरी सर्वानुमते पदोन्नती करण्यात येईल असे महापौरांनी जाहीर केले.

पदोन्नती देताना काही अधिकार्‍यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला तसेच महापालिकेत उपायुक्त पदाचे दोन जागा रिक्त असतानाही या जागेवर कोणाचीही नेमणूक करण्यात आली नसल्याचा आक्षेप नगरसेवकांनी घेतला परत सेवेतील अधिकार्‍यांना महापालिकेत आणून स्थानिक सेवकांना डावल्याच्या उद्देशाने उपायुक्त पदावर कोणालाही पदोन्नती देण्यात आली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com