शिवसेना नगरसेवकांचे ‘रामायण’ वर ‘महाभारत’

शिवसेना नगरसेवकांचे ‘रामायण’ वर ‘महाभारत’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शासन निर्देशाप्रमाणे आज पुन्हा महापालिकेत NMC महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन महासभेचे Online Meeting आयोजन करण्यात आले होते. मात्र कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शिवसेना गटनेते विलास शिंदे Shiv Sena group leader Vilas Shinde यांच्या कार्यालयातील संगणक तसेच ऑनलाईन सेटअप Online set up प्रशासनाने काढून घेतल्याने शिवसेना नगरसेवकांनी 'रामायण' निवासस्थानाकडे धाव घेत चालू महासभेत महापौरांना जाब विचारला, यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे रामायणावर महाभारत अशी चर्चा रंगली होती.

महापौरांनी आदेश देऊन तात्काळ संगणक यंत्रणा बसवली व परवानगी न देता ते काढण्यात कसे आले, याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेना सदस्य शांत झाले. आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

मागील काही काळा करोना रुग्ण संख्या वाढल्याने शासनाने पुन्हा ऑनलाईन सभा घेण्याचे आदेश दिल्याने ही सभा झाली. ऑनलाइन सभेत त्यांनी आपले विषय मांडले. मनपातील शिवसेना गटनेते विलास शिंदे यांचा ऑनलाइन सभेसाठी असलेला कॉम्प्युटर आणि लॅपटॉप ऐन ऑनलाईन सभेच्या वेळी काढून घेण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेवक सुर्यकांत लवटे यांनी थेट महापौरांच्या दालनात थेट धडक देत महापौरांना जाब विचारला.

यंदा महापौर कुलकर्णी हे स्थायीच्या सभागृहात न बसता ते रामायण या महापौरांच्या शासकीय निवास्थानी बसले होते. यामुळे सेनेचे संतप्त झालेले नगरसेवक राजीव गांधी भवनमधून पायी चालत येऊन महापौरांना जाब विचारण्यासाठी आले होते. दरम्यान महापौरांनी देखील याबाबतची कल्पना नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले तसे त्यांनी त्वरित यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले व हे उद्योग कोणी केली याची चौकशी करण्याचे आदेश दिले यानंतर शिवसेना सदस्य पुन्हा कार्यालयात जाऊन त्यांनी ऑनलाईन सभेत भाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com