दूध उत्पादकांसाठी शिवसंग्रामचे आज राज्यभर आंदोलन
नाशिक

दूध उत्पादकांसाठी शिवसंग्रामचे आज राज्यभर आंदोलन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दूध उत्पादकांच्या समर्थनार्थ भाजप व शिवसंग्रामच आज (दि.२०) राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. तहसीलदार,जिल्हाधिकारी यांना निवेदन आणि दूध पिशवी भेट देऊन आंदोलन केले जाईल अशी माहिति शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

शासकिय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दूध उत्पादकांना कोणतीच संस्था २५ रुपये भाव देत नाही. १० रुपये प्रति लिटर दूध उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावं ही मागणी त्यांनी केली. आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.

- मराठा आरक्षणाबाबत फक्त एकनाथ शिंदें हेच चांगली भूमिका मांडत आहे. बाकी मुख्यमंत्रीसह सर्वच मंत्री दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव सत्तेत आसताना साधू, संत कीर्तनकार यांच्यावर अन्याय होत आहे. इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार. आमचा इंदोरीकर महाराज यांना पाठिंबा आहे. राममंदिर बनत आहे ही चांगली गोष्ट आहे, सर्व हिंदू वाट बघत होतो. सरपंच नियुक्तीचे अधिकार पाकमंत्र्यांना दिले आहे ही लोकशाहीची हत्त्या असल्याचा घणाघात त्यांनी केला.

Deshdoot
www.deshdoot.com