शिवसंग्राम
शिवसंग्राम
नाशिक

'दुधाला भाव मिळालाच पाहिजे'...जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसंग्रामचे आंदोलन

राज्यभर आंदोलन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

दुधाला भाव मिळालाच पाहिजे' अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यासमोर शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादकांच्या समर्थनार्थ भाजप व शिवसंग्रामने आज (दि.२०) राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे तसेच शिवसंग्रामचे इतर पदाधिकारी शारीरिक अंतर राखत उपस्थित होते.

दरम्यान दूध उत्पादकांना कोणतीच संस्था २५ रुपये भाव देत नाही. १० रुपये प्रति लिटर दूध उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावं ही मागणी त्यांनी केली. आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com