नवीन नाशिक परिसरात शिवसंपर्क अभियान

नवीन नाशिक परिसरात शिवसंपर्क अभियान

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

तिडकेनगर (Tidkenagar), कर्मयोगीनगर (Karmayoginagar), जगतापनगरमध्ये (Jagtapanagar) शिवसंपर्क अभियानाअंतर्गत समस्या निवारण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला...

महावितरण (MSEDCL) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक उघडी डीपी आणि लोंबकळणाऱ्या तारांची पाहणी केली, हे प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच महापालिकेने (Municipal Corporation) बंद पडलेल्या बोअरवेलचा विद्युतपंप दुरुस्तीसाठी नेला.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते २४ जुलै या काळात राज्यभर शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyan) राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत समस्या निवारण मोहिमेला तिडकेनगर येथे प्रारंभ झाला.

जगतापनगर येथे उंटवाडीकडे (Untwadi) जाणाऱ्या रस्त्यावर ४४० व्होल्टच्या डीपीचा एक दरवाजा तुटल्याने ती उघडी आहे. तिला स्पर्श झाल्यास जीवितहानीची शक्यता आहे.

तिडकेनगर येथे प्राची बिल्डींगपासून प्रियंका पार्क रस्त्यावर गेल्या पाच वर्षांपासून विद्युत प्रवाह नसलेली तार लोंबकळलेली आहे. हीच स्थिती कर्मयोगीनगर येथे छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेजवळ आहे. या तारा खाली पडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

शिवसैनिक व सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (Babasaheb Gaikwad), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (Charushila Gaikwad) यांनी याबाबत तक्रार केली होती.

वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, सहाय्यक अभियंता प्रदीप गवई, सेवक दीपक शिर्के यांनी या ठिकाणी पाहणी केली.त्यांनी ही समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले.

प्रियंका पार्क येथे महापालिकेच्या भूखंडावरील बोअरवेल काही वर्षांपासून बंद आहे, तेथील विद्युत मोटर बाहेर काढून महापालिकेने दुरुस्तीसाठी नेली.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, पुरुषोत्तम शिरोडे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, संजय टकले, राजाराम चोपडे, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com