शिवसैनिकांनी निरपेक्ष भावनेने काम करावे : खा. सावंत

शिवसैनिकांनी निरपेक्ष भावनेने काम करावे : खा. सावंत

इंदिरानगर । वार्ताहर | Indira Nagar

दिलेला आदेश तत्काळ पाळणारा शिवसैनिक (shiv sainik) हवा. या अभियानातून मनपावर (Municipal Corporation) भगवा फडकवण्यासाठी शपथबद्ध व्हा. नागरिकांनी प्रश्न विचारले असता शिवसैनिकांनी घाबरायला नको.

लोकांची मने जिंका. तिकीट कोणाला द्यायचे, हे पक्षप्रमुख ठरवतील. तिकीट मिळाले नाही म्हणून दुसरी वाट धरू नये. शिवसैनिकांनी निरपेक्ष भावनेने काम करा, असा सल्ला शिवसेनेचे उपनेते माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत (Shiv Sena Deputy Leader Former Union Minister, MP Arvind Sawant) यांनी शिवसंपर्क अभियानातंर्गत आयोजित मेळावा प्रसंगी शिवसैनिकांंना दिला. चेतनानगर येथील भागवत सभागृहात शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyan) अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते संजय काळे (BJP activist Sanjay Kale) यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत (shiv sena) प्रवेश केला. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhari), सुनील बागुल (Sunil Bagul), जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar), महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar), अजय बोरस्ते (Ajay Boraste), शरद गिते, प्रफुल्ल भोसले, देवानंद बिरारी, अमोल जाधव, संगीता जाधव, सागर देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजपने जे काय काम केले हे जनतेला सांगितले पाहिजे. सत्तर वर्षात जे कमावले ते आज भाजप विकत आहे. हम दो, हमारे दो देश चालवत आहे. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सर्वोच्च भिकारी भारतात आहे. भाजप लोकांच्या मनात विष पेरत आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावध झाले पाहिजे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी करोना (corona) काळात उल्लेखनिय कार्य केले. हे कार्य शिवसैनिकांनी घराघरात पोहोचवले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी बंडू दळवी, दीपक पंडित, शैलेश कार्ले, रंजय काळे, स्वप्नील वाघ, धीरज जोशी, करुणा धामणे, रत्नाबाई काळे, शोभा दोंदे, पूनम पंडित यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

संजय काळे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत सावंत म्हणाले की, एका संजयला दुसरे संजय मिळाले. यामुळे पक्षाची ताकद नक्कीच वाढणार आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर निवडणुकीचे तिकीट दिले जाईल. पक्ष काम करताना मात्र शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार जपले जावे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com