मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यास शिवसैनिकांनी उपस्थित राहावे: दुसाने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यास शिवसैनिकांनी उपस्थित राहावे: दुसाने

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मुंबई (Mumbai) येथे येत्या 5 ऑक्टोंबररोजी आयोजित दसरा मेळाव्यास (Dasra Melava) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या

विचाराचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिकांनी (shiv sainik) हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय दुसाने (District Chief Sanjay Dusane) यांनी येथे बोलतांना केले.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ना. दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव व युवानेते अविष्कार भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना दुसाने बोलत होते. या बैठकीत बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे (Ports and Mines Minister Dada Bhuse) यांची उपनेतेपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

दसरा मेळाव्यास वाजतगाजत आपल्या गावापासून मुंबईपर्यंत (mumbai) हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakarey), धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा जयजयकार करत शिवसैनिकांनी नेहमीप्रमाणे जायचे आहे. शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव व उपमहापौर नीलेश आहेर यांनी मार्गदर्शन करतांना केले.

नियोजन बैठकीस सुनिल देवरे, केवळ हिरे, शशी निकम, नारायण शिंदे, भिमा भडांगे, संगीता चव्हाण, राजेश गंगावणे, छाया शेवाळे, ललित घोडके, राजेश अलीझाड, प्रमोद पाटील, जयराज बच्छाव, दिनेश गवळी, प्रिती पठाडे, साधना सोनवणे, अशा पवार, अरूणा चौधरी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यशपाल बागुल यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com