'एसएफसी'च्या रोषणाईची सर्वत्र चर्चा

'एसएफसी'च्या रोषणाईची सर्वत्र चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती हिरावाडी परिसरातील शक्ती नगर (Shaktinagar) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. एसएफसी फाउंडेशनतर्फे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याभोवती आकर्षक रोषणाईदेखील करण्यात आली होती. आकर्षक रोषणाईची सर्वत्र चर्चा होत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन एसएफसी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव गोवर्धने (Gaurav Govardhane) यांनी केले होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिमेचे पूजन केले. आरती यशराज राजे भोसले, आमदार राहुल ढिकले, नगरसेवक हेमंत शेट्टी, किरण सोनवणे यांच्या हस्ते झाली.

प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.

याप्रसंगी कुणाल गोवर्धने, बबलू साबळे, विशाल भोसले, जगदीश दिघे, सागर हिंगमिरे, संजय शिंदे, राजेश बोडके, बबलू नहिरे, राहुल भडके, शिवम बागुल, रोहित धोंड, सचिन गाढे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com