शितल पवार यांनी स्वीकारली सरपंच पदाची सूत्रे

शितल पवार यांनी स्वीकारली सरपंच पदाची सूत्रे

उमराणे | वार्ताहर umrane

मालेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची व सर्वात मोठी असलेल्या सौंदाणे ग्रामपंचायतची (Soundane Grampanchayat )सूत्रे आज शितल चेतन पवार यांनी स्वीकारली

मागील महिन्यात थेट सरपंच पदासाठी चुरशीची तिरंगी लढत झाली या लढतीत युवा सेनेचे चेतन पवार यांच्या पत्नी शितल पवार यांनी 3308 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला होता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी बी के भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत शितल पवार यांनी सरपंच पदाची सूत्रे स्वीकारली व त्यानंतर उपसरपंच पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम झाला.

युवा कार्यकर्ते युवराज बाळासाहेब खैरनार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली निवड जाहीर होताच फटाके फोडण्यात आले.

दादासाहेब भुसे आगे बढो ,चेतन पवार आगे बढो च्या घोषणा देत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले माजी सभापती भरत पवार कृषी उत्पन्न बाजार समिती गोरख पवार माजी सरपंच डॉ मिलिंद पवार,विकास सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब जंगलू पवार व व्हाईस चेअरमन सतीश पांडुरंग पवार ,आबा पवार ,संदीप पवार, रिंगनाथ पगार , राज छाजेड यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com