भाषेचे गाव म्हणून शिरवाडे वणी विकसित करणार : आ. बनकर

भाषेचे गाव म्हणून शिरवाडे वणी विकसित करणार : आ. बनकर

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirvade Vani

कुसुमाग्रज (kusumagraj) तथा शिरवाडकर (shirvadkar) यांच्या साहित्यावर अनेक पिढया संस्कारित होत आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा आणि पुढील पिढीला त्यांच्या साहित्यिक जीवनाचा परिचय होत रहावा म्हणून तात्यासाहेब शिरवाडकर (Tatyasaheb Shirwadkar) यांच्या स्मारकाला यापूर्वी 1 कोटी 78 लाख रु. निधी (fund) मिळवून दिला आहे.

या आर्थिक वर्षात 2 कोटी रुपये निधी कुसुमाग्रज स्मारकाच्या विकासासाठी मंजूर करून घेतला आहे. यापुढेही शिरवाडे वणी (shirvade vani) गावाला जो काही निधी लागेल तो मिळवून देण्यासाठी मी सदैव कटीबद्ध राहीन. कुसुमाग्रजांचे गाव भाषेचे गाव (Village of language) म्हणून विकसित करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील राहील असे आश्वासन आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी दिले आहे.

शिरवाडे वणी येथे ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मगावी त्यांचा जन्मदिन व जागतिक मराठी भाषा दिन (World Marathi Language Day) प्रथमच साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार बनकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी ढेपले, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, प्रा.लक्ष्मण महाडिक, प्रा.संदीप जगताप,

सरपंच शरद काळे, पिंपळगाव बाजार समितीच्या संचालक अश्विनी काळे, मंडल अधिकारी शीतल कुयटे, उपसरपंच प्रतिभा गांगुर्डे, चंद्रकांत कुशारे, हेमंत थेटे, सुरेश सलादे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन होवून प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब क्षीरसागर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा, विशेषता नटसम्राट नाटकाचा संदर्भ देत शिरवाडकरांचे गाव मराठी भाषेचे गाव म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Marathi Language Minister Subhash Desai) यांच्याकडे प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण महाडिक, प्रा.संदीप जगताप, सरपंच शरद काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. तर जिल्ह्यातील कवी माधव जाधव, डॉ.प्रा.कैलास सलादे, रवींद्र मालूंजकर, विवेक उगलमुगले, संतोष वाटपाडे, राजेंद्र सोमवंशी, प्रा.गुरुदेव गांगुर्डे, प्रा.किशोर गोसावी, अमोल चिने, रावसाहेब जाधव, दत्ता सोनवणे, सोमनाथ पवार, मुकुंद ताकाटे, सचिन गांगुर्डे, दत्ता सोनवणे, जयश्री वाघ, राजेंद्र गांगुर्डे, रावसाहेब जाधव, सागर जाधव, डॉ.शोभा जाधव, सरला देशमाने, काजल आहेर, निर्मला खांगळ, युवराज सगर,

नंदिनी गांगुर्डे आदींसह चाळीस कवींनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन सुरेश सलादे, रवींद्र मालूंजकर यांनी तर शरद काळे यांनी आभार मानले. याप्रसंगी उत्तम निफाडे, गोविंद ठाकरे, सोनुपंत आहेर, दत्तात्रय निफाडे, किशोर निफाडे, संतोष शिंदे, सचिन निफाडे, राहूल गायकवाड, वसंत निफाडे, त्र्यंबक काळे, रतन निफाडे आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com