शिर्डी येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित नाशकात जेरबंद

शिर्डी येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित नाशकात जेरबंद
क्राईम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिर्डी (Shirdi) येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेले दोन संशयित आरोपी नाशिकमध्ये (Nashik) जेरबंद (Arrested) करण्यास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या (Crime Branch Unit No. 1) पथकाला यश मिळाले....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथे निसर्ग हॉटेलच्या (Nisarg Hotel) विरुद्धबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बसलेले राजेंद्र धीवर (Rajendra Dhiwar) यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून त्यांना जिवे ठार मारले.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) पोलिसांना मिळाले होते, मात्र ते अस्पष्ट होते. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये हे फुटेज पाठविण्यात आले.

याप्रकरणी तपास करत असताना नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस नाईक प्रवीण वाघमारे (Praveen Waghmare) यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलेल्या वर्णनाचे व्यक्ती हे पाथर्डी गाव (Pathardi village) येथे राहत आहेत. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ (Ananda Wagh) यांना याबाबत माहिती मिळाली.

यावेळी वपोनी आनंदा वाघ, सपोनी महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस नाईक प्रवीण वाघमारे, विशाल काटे, महेश साळुंखे, विशाल देवरे, समाधान पवार आदींच्या पथकाने संशयितांचा तपास सुखदेवनगर (Sukhdevnagar) पाथर्डी गाव नाशिक येथे केला असता संशयित अविनाश प्रल्हाद सावंत (Avinash Pralhad Sawant) (20 रा. सुखदेव नगर पाथर्डी गाव) हा राहत्या घरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची प्राथमिक कबुली दिली, तसेच त्याचा साथीदार चंद्रहास उर्फ राज सुभाष उबाळे (Subhash Ubale) (१९ रा. पाथर्डी गाव राजवाडा) याचा शोध घेतला असता तो म्हसरूळ (Mhasrul) परिसरात मिळून आला. दोघांनाही शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com