शिर्डी महामार्ग फुलला; रामनवमीसाठी साईभक्तांचे शिर्डीकडे प्रस्थान

शिर्डी महामार्ग फुलला; रामनवमीसाठी साईभक्तांचे शिर्डीकडे प्रस्थान

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

श्री क्षेत्र शिर्डी (shirdi) येथे साईनाथ महाराजांच्या (sai baba) श्रीरामनवमी (Sri Ram Navami) उत्सवासाठी मुंबईकडून (mumbai) येणार्‍या साई पालख्यांचा ओघ आता वाढू लागल्याने सिन्नर-शिर्डी महामार्ग (Sinnar-Shirdi Highway) साईभक्तांनी फुलला आहे. दोन दिवसात हजारो साईभक्तांचे पालख्यांसह शिर्डीकडे प्रस्थान झाले आहे.

जगभरासह मुंबईकरांचे श्रध्दास्थान असलेल्या साईंच्या शिर्डी नगरीत वर्षभर पालखी सोहळा सुरु असतो. रामनवमी (Ramanavami) व गुरुपौर्णिमा (Gurupournima) या दोन तिथीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोच्या पार्श्वभुमिवर मंदिरात दर्शनासाठी पालखी सोहळे थांबवण्यात आले होते. मात्र, यंदा शासनाने सर्व निर्बंध हटवल्याने शिर्डीत (shirdi) साईभक्तांची गर्दी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली असली याचा कुठलाही परिणाम साईभक्तांवर जाणवत नसल्याचे दिसून येत आहे.

उष्म्याचे प्रमाण वाढूनही जिवाची पर्वा न करता हजारो साईभक्तांची पावले शिर्डीच्या दिशेने पडताहेत. मुख्यतः मुंबई (mumbai) आणि सुरतच्या (surat) दिशेने शिर्डीकडे या पालख्या मार्गस्थ होत आहेत. विशेष म्हणजे, आता निबंध उठविल्यानंतर या पालखी सोहळ्यात साईभक्तांची संख्या वाढलेली आहे. आत्तापर्यंत 25 हजारांच्यावर साईभक्त मुंबइेहून शिर्डीत दाखल झाले आहेत. डोंबिवली, ठाणे, वसई, विरार, कल्याण, उल्हासनगर, डहाणू, पालघर, मुरबाड आदी ठिकाणांहून तालुक्याच्या आसपासच्या परिसरातील या पालख्या आता पोहोचत आहेत.

जागोजागी पालख्यांचे स्वागत

नाशिकमधून सिन्नरमार्गे किंवा घोटीमार्गे या पालख्या शिर्डीच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहेत. यंदा निबंध नसल्याने पालख्यांचे नियोजित स्थळी सडा-रांगोळीने स्वागत होत आहे. दोन दिवसांपासून सिन्नर शहरासह पांढुर्ली, लोणारवाडी, मुसळगाव, दातली, खोपडी, पांगरी, वावी, पाथरे या भागात पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. अन्नदानासह आरोग्यसेवा पुरविण्यासाठी स्थानिकांच्यावतीने नियोजन होत आहे.

व्यावसायिकांमध्ये चैतन्य

मुंबई व नाशिकहून येणार्‍या पालख्या या शहरासह ग्रामीण मागात थांबा घेत असल्याने पालखीसोबत आलेल्या साईभक्तांकडून विविध वस्तू खरेदी केल्या जात आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरासह शिर्डी महामार्गावरील ठप्प पडलेल्या हॉटेल व्यावसायिंकांमध्येही त्यामूळे चैतन्ंयाचे वातावरण संचारले आहे. पालखीसोबत येणारे साईभक्त चहा, नाश्ता, जेवण करण्यासाठी हॉटेल्स, रसवंती, शितपेयं, फळांच्या दुकानांत गर्दी करत असल्याने या काळात लाखोंची उलाढाल होईल असा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com