डॉ. मंजूर अय्युबी यांना शायनिंग स्टार पुरस्कार

डॉ. मंजूर अय्युबी यांना शायनिंग स्टार पुरस्कार

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

येथील सिटीझन कॅम्पसचे (Citizen Campus) अध्यक्ष डॉ. मंजूर हसन अय्युबी (Dr. Manzoor Hassan Ayubi) यांना शैक्षणिक क्षेत्रातील (education sector) महत्वपुर्ण योगदानाबद्दल ‘शायनिंग स्टार ऑफ एशिया’ (Shining Star of Asia) पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

वैद्यकिय क्षेत्राबरोबरच (Medical Sector) राजकीय (political), सामाजिक (social), साहित्यीक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून डॉ. अय्युबी हे शहरात परिचित आहेत. सिटीझन कॅम्पसच्या माध्यमातून त्यांनी झोपडपट्टी भागात (slum area)) राहणार्‍या गोरगरीब रहिवाशांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर (National and international level) यापुर्वीही दखल घेण्यात आलेली असून अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

नवी दिल्ली (Navi Delhi) येथील इंटरनॅशनल अमेरिकन कौन्सील फॉर रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट संस्थेतर्फे (International American Council for Research and Development Organization) या संस्थेने डॉ. अय्युबी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेवून नुकतेच त्यांना शायनिंग स्टार ऑफ एशिया पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. इनडीव्हीजल अच्युव्हमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅवॉर्ड (Individual Achievement and Development Award) आयोजित राष्ट्रीय सेमीनारमध्ये डॉ. अय्युबी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अय्युबी यांचे सर्वथरातून अभिनंदन केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com