राष्ट्रीय निवड चाचणीत नाशिकच्या खेळाडूंची चमक

राष्ट्रीय निवड चाचणीत नाशिकच्या खेळाडूंची चमक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कटक Cuttack येथे 19 ते 23 सप्टेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय सब ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी National Sub Junior Softball Championships महाराष्ट्र संघाची निवड Selection of Maharashtra teamचाचणी स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराष्ट्र विद्यापीठ, नागपूर Nagpur येथे येथे पार पडली. निवड चाचणी साठी 26 जिल्ह्यातील कुमार व कुमारी गटातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

महाराष्ट्राचा संघ गेल्या 6 वर्षांपासून सलग पदक विजेता असल्याने या वर्षीसुद्धा बलाढ्य आणि तुल्यबळ संघ निवडीसाठी चांगलीच चुरस होती. या निवड चाचणीमध्ये नाशिकच्या खेळाडूंनीसुद्धा उपस्थिती लावली.

नाशिक संघामधील सर्वोत्कृष्ट असे 4 खेळाडू नागपूरला उपस्थित होते. या निवड चाचणीमध्ये नाशिकचे प्रवीण गोरख चव्हाण, वेदांत दीपक राऊत व विजय कैलास राठोड या तिघांनी उत्तम असा खेळ करत महाराष्ट्र संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नाशिक सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव हेमंत देशपांडे व म. वि. प्र. संस्थेचे क्रीडाशिक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com