
नाशिक | Nashik
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शिंदेंची शिवसेना (Shinde ShivSena) चांगलीच आक्रमक झाली असून आज नाशिकमध्ये (Nashik) रस्त्यावर उतरत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला...
नाशिक शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशेजारी (ShivSena Central Office) हे आंदोलन (Agitation) करण्यात आले. यावेळी सुषमा अंधारे यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच जोपर्यंत सुषमा अंधारे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना नाशिकमध्ये प्रवेश देणार नाही, असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला. याशिवाय ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्यांसोबत ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे असणारे फोटोही यावेळी बॅनरवर झळकविण्यात आले. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेल्या आरोपांनंतर मंत्री भुसे यांनी 'सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत, चौकशीमध्ये सत्य समोर येईल. तसेच अंधारेंनी आपला आरोप सिद्ध करावा, अन्यथा मालेगाव (Malegaon) शहरवासीयांची माफी मागावी, असे प्रति आव्हान दिले आहे.