नवीन इमारत झाली; परंतू उपभोग केव्हा ?

नवीन इमारत झाली; परंतू उपभोग केव्हा ?

खेडगाव प्रा. आ. केंद्राचे स्थलांतर प्रतिक्षेतच

खेडगाव। खंडेराव डोखळे | Khedgaon

खेडगाव (Khedgaon) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची (Primary Health Centre) जुनी इमारत जीर्ण झाली होती. सध्या आरोग्य केंद्र कर्मचार्‍यांच्या निवासस्थान इमारतीत चालू असून उपचार केले जातात.

मुसळधार पावसामुळे (heavy rain) रुग्णांची हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याच आवारात कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन इमारत (New building) उभारण्यात आली असून निव्वळ देखावा बनली आहे. आरोग्य केंद्र नवीन इमारतीत त्वरित स्थलांतर करून योग्य पद्धतीने सेवा देण्यात यावी अशी मागणी खेडगावसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अतिवृष्टी (heavy rain) होत असल्यामुळे विविध आजाराने रुग्ण संख्या वाढली असून त्याचबरोबर प्रसुतीसाठी आलेल्या येथील महिलांना आरोग्य अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी सोय नसल्याचे कारण सांगत वणी (vani), दिंडोरी (dindori) येथे जाण्यास सांगून आपल्यावरील कामाचा ताण कमी करीत आहे. त्यामुळे रुग्णाला खाजगी किंवा इतर ठिकाणी जाऊन उपचार करून घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. गर्भवती महिलांसाठी होणारे मानवविकासचे कार्यक्रमही सभागृह नसल्याने उघडयावर होत आहे. यामुळे कुटुंबप्रमुखही गर्भवती महिलांना पाठवण्यासाठी तयार होत नाही.

दोन वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करून सर्व सुविधायुक्त नूतन आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारतीचे काम पावसाळा (monsoon) सुरू होण्याच्या आधीच पूर्ण करण्यात आले आहे. मात्र तिचा अद्याप वापर करण्यात आलेला नाही. येथील इमारतीच्या आवारात इमारतीचे मटेरियल पडलेले असून रुग्णवाहिका (Ambulance) बंद अवस्थेत उभी असल्याने या ठिकाणी विषारी सर्प, विंचू यांचे वास्तव तयार झाले आहे. परिसरात झाडाझुडपांसह घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रुग्णांना (patients) उपचार घेताना मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

खेडगावसह परिसरातील उपकेंद्रातील ग्रामस्थांनी संबधित विभागकडे आरोग्य केंद्र (Health Center) बाबत समस्यांचा पाडा वाचूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेडगाव (khedgaon) हे तालुक्यातील आदर्श गाव म्हणून बघितले जाते. दिंडोरी तालुक्याचे (dindori taluka) राजकारण (politics) खेडगाव मधुन चालते, असे बोलले जाते. असे असतांना खेडगाव येथील आरोग्य सेवेचा खेळखंडोबा म्हणजे नक्कीच दुदैव म्हणावे लागेल. आरोग्य सेवा देण्यासाठी जीर्ण इमारत अडचणीची ठरत होती. त्यामुळे येथे स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे येथे सुसज्ज इमारत उभी राहिली आहे.

परंतू ती इमारत पुर्ण होवून देखील अद्यापही त्याचा उपभोग घेता येत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. आता संबंधित प्रशासन फर्निचरच्या नावाखाली स्थलांतरचा मुद्द्ा राखून ठेवत आहे. परंतू जुन्या फर्निचर (Furniture) नवीन इमारतीत घेवून जावून रुग्णांना आवश्यक ती सेवा देण्यास काय हरकत आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांना मुबलक आरोग्य सेवा मिळण्यासाठी तात्काळ आहे त्या परिस्थितीत स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम पुर्ण झाले आहे. नवीन इमारतीमध्ये कामकाज सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या इमारतीमध्ये फर्निचर नसल्याने त्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे मागणी केली आहे. त्याची लवकरच पुर्तता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच आम्ही इमारतीचे स्थलातंर करु.

डॉ. सुभाष मांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी

खेडगाव प्राथमिक आरोग्य केेंंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेपुर सुविधा मिळण्यासाठी इमारतीची अडचण यायला नको. फर्निचरसाठी ना. झिरवाळ साहेब प्रयत्न करीत आहे. शासकीय निधी येईलच, परंतू त्याची नक्की वेळ सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सेवा मुबलक मिळण्यासाठी तत्काळ नवीन इमारतीत स्थलांतर होणे आवश्यक आहे.

भास्कर भगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com