शेटेंनी साखर कारखाने सुस्थितीत ठेवण्याचे काम केले

खा. शरद पवार यांचे प्रतिपादन
शेटेंनी साखर कारखाने सुस्थितीत ठेवण्याचे काम केले

जानोरी । वार्ताहर Janori

‘महाराष्ट्रासह (Maharashtra) नाशिक जिल्ह्यातील (nashik district) साखर कारखान्यांचे (Sugar factories) भवितव्य अंधकारमय असताना कादवा (kadva) कारखान्याच्या माध्यमातून बंद पडलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था आणण्याला बळ आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरदचंद्र पवार (sharad pawar) यांनी केले.

कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे (shreiram shete) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (Amritmahotsavi Varsha) आयोजित अभिष्टचिंतन सोहळा (Abhishtachintan Sohala), नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal) यांची विधानसभा उपाध्यक्षपदी (Deputy Speaker of the Assembly) निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व मविप्र संस्थेचे कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय खेडगाव (khedgaon) येथील नवीन इमारत उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal), खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil), प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार (Neelima Pawar), अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे,

कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते (manikrao boraste), उपसभापती राघो आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, आ. दिलीपराव बनकर (mla diliprao bankar), आ. माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate), आ. सरोज अहिरे (mla saroj ahire), आ. नितीन पवार (mla nitin pawar), आ. हिरामण खोसकर (mla hiraman khoskar), आ. डॉ. सुधीर तांबे (mla sudhir tambe), जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर (balasaheb kshirsagar), माजी खासदार देविदास पिंगळे (devidas pingle), जेष्ठ नेते भगीरथ शिंदे, पंढरीनाथ थोरे, रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, गणपतराव पाटील, विद्याताई पाटील, नानासाहेब बोरस्ते, सचिन पिंगळे आदींसह मविप्र संस्थेचे कार्यकारी संचालक व मान्यवर उपस्थित होते.

खा. शरद पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात (maharashtra) शैक्षणिक संस्थांचे (Educational Institutions) जाळे उभारण्यासाठी ज्यांनी योगदान दिले. त्यात नाशिक जिल्ह्यातील कर्मविरांचा मोठा वाटा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे आपण नाव घेतो ते केवळ त्यांनी देशाला दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळेच. महात्मा फुले (mahatma phule) आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते आणि नाशिकमध्ये झालेले साहित्य संमेलन (Literary convention) देखील विज्ञानाला वाहून दिले. हा फुले यांच्या कार्याचा गौरव आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात आवश्यक बदल घडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.

द्राक्ष, उस, डाळिंब, फुल, कांदा आदी पिकांसाठी चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू. लवकर चित्र पालटेल, असा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री भुजबळ यांनी श्रीराम शेटे यांच्या कार्याविषयी स्तुतीसुमने उधळताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) कार्यातील योगदानाचे आवर्जून कौतूक केले. मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार (MVP General Secretary Neelima Pawar) म्हणाल्या, मविप्रच्या पाच इमारतींचे उदघाटन झाले आहे. अजून 30 इमारतींची उद्घाटने बाकी आहे. त्यासाठी खा. शरद पवार यांना तीन महिन्यांनी पुन्हा नाशिकला यावे लागेल.

त्यांनाही यायला आवडेल, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला. संस्थेच्या विकास कामांची माहिती त्यानी यावेळी दिली. सत्कारमूर्ती श्रीराम शेटे म्हणाले, शिक्षण झाल्यानंतर मी शेती व्यवसायाला लागलो. चिखल, माती तुडवत असताना शेतीतील अडचणी व शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात आल्या. त्यानंतर माझे राजकारणात येणे झाले. ग्रामपंचायत, पंचायत समिती (panchayat samiti) असा प्रवास करून आदिवासी, शेतकरी, गरजूंना मदत करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून रस्ते बांधण्यासाठी दिल्लीला पाठविलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर झाला.

साहजिकच तालुक्यातील गावे एकमेकांना जोडली गेली. नंतरच्या काळात धरणांतील पाणी पोटचार्यांच्या माध्यमातून शेतात आणल्याने विविध पिके शेतकर्‍यांना घेता आली. खा. शरद पवार यांच्यासमोर मांजरपाडा प्रकल्पाचा प्रश्न मांडताच तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिल्याचे सांगत पवार यांचे नाशिक जिल्ह्यावरील प्रेम किती आहे, हे सांगितले. खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. अमृताचे थेंब ज्या भूमित पडले त्या भूमित श्रीरामाचा सत्कार होतोय, हे बघण्याचे भाग्य मला लाभले, ही समाधानाची बाब असल्याचे नमूद केले. नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार उतारवयातही जे काम करीत आहे, ते कोणीही करू शकत नाही. श्रीराम शेटे यांनी तीनदा पराभव स्विकारला.

मात्र, त्यांचा आदर्श घेऊनच मला पुढे राजकारणात यश मिळाल्याचा उल्लेख केला. एकदरा सिंचनप्रश्नी अधिकार्यांसोबत बैठक घेण्याची गळ यावेळी त्यांनी पवार यांना घातली. द्राक्ष उत्पादकांसाठी चांगल्या पॅकेजची घोषणा करण्याबरोबरच कर्जमाफीबाबत उर्वरित शेतकर्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे. कार्यक्रमाचे प्रास्तविक मविप्र संस्थेचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पाटील यांनी मविप्र संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील कामकाजाची माहिती सांगून इमारती बांधकाम करून संस्थेच्या भौतिक सुविधेबरोबरच गुणात्मक विकास होत आहे.

मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी सांगितले की मविप्र संस्था ही शैक्षणिक क्षेत्रात कामकाज करतांना बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्ती प्रमाणे कार्य करत असून कर्मवीरांनी आदर्श घालून दिलेल्या सूत्रानुसार मविप्र संस्थेचे कामकाज सुरू आहे. आभार मविप्र चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी मानले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे सर्व कार्यकारी संचालक, कादवा कारखान्याचे संचालक, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गटातील युवा नेते व मागील काळात भाजपाच्या वतीने जिल्हा परिषदेची उमेदवारी करून दोन नंबर मते मिळविणारे तुकाराम जोंधळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. कोचरगाव गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, वैभव पाटील, वनारवाडीचे उपसरपंच दत्तू भेरे, किरण नाईक आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com