आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येवला तालुक्यातील ( Yeola Taluka ) लक्षवेधी ठरलेल्या आंबेगाव( Aambegaon) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ( Co-operative Society Election )शेतकरी विकास पॅनलने तेरापैकी १२ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे.

गावांतर्गत दोन्ही गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चूरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली.त्यामुळे निकालाकडेही लक्ष लागले होते.

शेतकरी विकास पॅनलचे अशोक गिते,मनोज गिते,आनंदा गिते,पुंडलिक सोनवणे,नितीन काळे ,घनशाम काळे,भाऊसाहेब आव्हाड़, सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखालील १३ पैकी १२ जागांवर विजय संपादन करून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.तर शिवाजी आव्हाड़,विलास गिते,खंडू आव्हाड़,पंडीत आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन महविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

शेतकरी विकास पॅनलचे सर्वसाधारण गटातून आनंदा भिमा गिते,माणिक महादू गिते,सुखदेव रामभाऊ आव्हाड,भीमा महादू आव्हाड,गणेश मुरलीधर आव्हाड, वाल्मीक एकनाथ औटे,दत्तात्रय रतन सोनवणे हे उमेदवार विजयी झाले तर सोमनाथ नामदेव काळे हे एकमेव विरोधी गटाकडून निवडून आले.इतर मागास प्रवर्ग गटातून दत्तात्रय बाबुराव सुराडे हे अगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत.

महिला राखीव गटातून कांताबाई चंद्रकांत काळे व मंगल भाऊसाहेब गिते या निवडून आल्या.भटक्या जाती,विमुक्त जमाती गटातून राजेंद्र भागुजी दराडे निवडून आले.अनुसूचित जाती,जमाती गटातून मधुकर भालेराव विजय झाले.नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचा शाल,श्रीफळ व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.जे.पाटील व सचिव आर.एफ.पवार यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.