
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शनिवार आणि रविवार सुट्टीचा मुहूर्त साधून गृह शोधाची मोहीम पूर्ण करण्यास सोयीचे व्हावे, यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित 'शेल्टर' ( Shelter 2022) हे गृहप्रदर्शन यावेळी 5 दिवसांचे असून 24 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रदर्शनाची सांगता सोमवारी (दि.28) रात्री 8 वाजता होणार आहे.
अतिभव्य आंतरराष्ट्रीय स्तरास साजेसे असे नीटनेटके आयोजन, आकर्षक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल, पार्किंगची प्रशस्त सोय, विविध आकर्षक ऑफर्सची रेलचेल यामुळे या वेळेचे शेल्टर आगळे वेगळे ठरत असून चार दिवसात सुमारे 40,000 नागरिकांनी शेल्टरला भेट दिली असून 250 हून अधिक सदनिकांचे बुकिंग झाले आहे.कोणत्याही शहराच्या निर्मितीमध्ये तेथील बांधकाम व्यावसायिक यांची भूमिका मोलाची असते. नाशिक शहराचे लँडस्केप, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग यामध्ये 35 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या क्रेडाईची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले, विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा मनाशिक नेक्स्ट या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात 100 हून अधिक बिल्डर यांचे 500 हून अधिक प्रकल्प, बांधकाम साहित्य, इंटेरिअर तसेच आघाडीच्या गृह कर्ज देणार्या संस्था एकाच छताखाली आहेत. अगदी 9 लाख रुपये किमतीच्या प्लॉटपासून 5 कोटी रुपयांच्या फ्लॅट्स येथे उपलब्ध आहेत.मोठ्या शहरांसारख्या टाऊनशिपची सुरुवात नाशिक मध्ये काही वर्षांपूर्वी झाली अशा प्रकरच्या टाऊनशिपला अनेक कारणांमुळे देखील ग्राहकांची पसंती मिळत आहे.
मुंबई आणि पुणे यांच्या तुलनेत येथील रियल इस्टेटचे दर तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याने आज नाशिकमध्ये रियल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये निश्चितच फायदेशीर ठरेल. शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील म्हणाले, नाशिकमध्ये येऊ घातलेल्या अनेक नव्या व्यवसाय आणि उद्योगाच्या संधींमुळे नाशिकचे भविष्यातील चित्र खूप आश्वासक असून आज रिअल इस्टेट क्षेत्रात नाशिकमधील गुंतवणूक निश्चितच फलदायी ठरणार आहे. शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख घटना जितूभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिंवसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकर्णी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत.
समारोप कार्यक्रम
दि.28 रोजी संध्याकाळी होणार्या समारोप कार्यक्रमासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर, आ. सरोज आहिरे, आ. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. सी. एल. पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे हे मान्यवर देखील उपस्थित राहतील.
लकी ड्रॉ विजेते : 1.किरण पिंगळे 2. दीपक सूर्यवंशी 3.अभय काळे 4.अभिजीत अटल 5.अजित शिर्के