‘शेल्टर-2022’चा आज आरंभ

मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती
‘शेल्टर-2022’चा आज आरंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रगतीशील नाशिकमध्ये उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे ( CREDAI Nashik Metro ) आयोजित गृह प्रदर्शन शेल्टरचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे.

कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर, आ. सरोज आहिरे, आ. राहुल ढिकले आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे 28 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

’विचार समृद्धीचा...पत्ता नाशिकचा’, ’नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात भविष्यातील नाशिकची झलक बघावयास मिळणार असून भविष्यात शहरात येऊ घातलेल्या अनेक नवीन योजना आणि प्रकल्पामुळे झालेली रियल इस्टेटमधील गुंतवणूक भविष्यात नक्की फायदेशीर ठरणार आहे. नाशिक जवळील शहरे मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये असलेल्या संधी आणि तुलनेने कमी दर यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सध्या सुयोग्य वेळ असून शेल्टर प्रदर्शनामुळे ही एक नामीसंधी उपलब्ध आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील गृह प्रदर्शनाच्या इतिहासात ‘शेल्टर 2022’ ( Shelter -2022 )हे प्रदर्शन सर्वात भव्य म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास समन्वयक कृणाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख जितुभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून, क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य आदी कार्यरत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com