
निफाड । प्रतिनिधी | Niphad
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) 16 वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत (Cricket tournaments) नाशिक संघाकडून (Nashik Sangha) खेळताना
निफाडच्या (niphad) हुजैफ शेख (Huzaif Sheikh) याने चमकदार कामगिरी केल्याने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यात भेदक व प्रभावी गोलंदाजी करत पाच सामन्यांत नऊ डावात 27 बळी टिपून त्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण स्पर्धेत सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
नाशिक (nashik) विरुद्ध परभणी (Parbhani) या अंतिम सामन्यात त्याने चार बळी घेऊन आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. तर जालना (jalna) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 11 विकेटस् घेऊन त्याने मॅन ऑफ दि मॅचचा (Man of the Match) पुरस्कार मिळवला. सामान्य कुटुंबातील हुजैफ लतीफ शेख हा निफाडचा रहिवासी असून त्याचे वय 15 आहे. निफाड येथील वैनतेय विद्यालयात त्याचे 10 वीपर्यंत शिक्षण (education) झाले आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्याला क्रिकेटची आवड आहे. तो राईट हॅन्ड लेगस्पिनर (Right hand legspinner) असून नाशिक जिमखाना येथे तो सराव करतो.
त्याचे प्रशिक्षक म्हणून संजय मराठे, सतीश गायकवाड, शांताराम मेने यांनी मार्गदर्शन केले. त्याने आतापर्यंत 158 सामन्यांत 324 विकेटस् घेतल्या आहेत. मागील वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय 16 वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या दोन दिवसांच्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाशिक संघाकडून खेळताना तीन सामन्यात 15 विकेट घेऊन त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. हुजैफ शेख याच्या या यशस्वी कामगिरीबद्दल निफाड व परिसरात त्याचे कौतुक होत आहे.