सौंदाणेच्या सरपंचपदी शीतल पवार; तब्बल 'इतक्या' मतांनी मिळवला विजय

सौंदाणेच्या सरपंचपदी शीतल पवार; तब्बल 'इतक्या' मतांनी मिळवला विजय

उमराणे | वार्ताहर

मालेगाव तालुक्यातील (Malegaon taluka) राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणाऱ्या सौंदाणे ग्रामपंचायतीच्या (Saundane Gram Panchayat) तिरंगी लढतीत थेट सरपंचपदी शिंदे गटाच्या (Shinde Group) शीतल चेतन पवार यांचा मोठ्या मताधिक्क्याने दणदणीत विजय झाला आहे. यावेळी सौंदाणे येथे कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाके फोडत जल्लोष साजरा केला...

युवासेनेचे सदस्य असलेले चेतन पवार यांच्या पत्नी शीतल पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्या मातोश्री दगुबाई पवार व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद पवार यांच्या पत्नी अंजना पवार यांच्यात सरपंचपदासाठी थेट तिरंगी लढत झाली. या लढतीत २ हजार ८५४ मतांनी शीतल पवार यांचा विजय झाला. तर अंजना पवार यांना ४५४ व दगुबाई पवार यांना ४४६ मते मिळाली.

दरम्यान, थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Post) निवडणुकीत शीतल पवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यामुळे जिल्ह्यातील हा सरपंचपदाचा आत्तापर्यंत मोठा विजय असल्याचे चर्चिले जात आहे. तसेच शीतल पवार यांचे सौंदाणे गावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी (Activists) गुलाल उधळत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गावातील लोकांच्या भेटी घेत आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com