आंबेगाव उपसरपंचपदी शशिकांत गिते यांची बिनविरोध निवड

आंबेगाव उपसरपंचपदी शशिकांत गिते यांची बिनविरोध निवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येवला तालुक्यातील ( Yeola Taluka ) आंबेगाव ग्रामपंचायतीच्या ( Aambegaon Grampanchayat ) उपसरपंचपदी शशिकांत बनीचंद गिते ( Shashikant Gite )यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आवर्तनानुसार अलका काळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदी शशिकांत गिते यांची निवड झाली आहे. सरपंच अर्चना मनोज गिते यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीची सभा संपन्न झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक बी.एल.मोहिते यांनी काम पाहिले.त्यांना पूनम आव्हाड यांनी सहकार्य केले.

या निवडीनंतर गावाच्या विकासासाठी आपण सरपंच अर्चना गिते यांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्नशील करू,असे आश्वासन नवनिर्वाचित उपसरपंच शशिकांत गिते यांनी दिले.

यावेळी माजी उपसरपंच अलका काळे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गिते, अर्चना आव्हाड, गंगुबाई आव्हाड, सचिन भालेराव, आंबेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आनंदा गिते,अशोक गिते, पुंडलीक सोनवणे,सोमनाथ सांगळे, बनिचंद गिते,मनोज गिते,नितीन काळे,घनश्याम काळे,

बाबजी आव्हाड,भिमाजी संजय औटे,खंडू आव्हाड, श्रीनिवास गिते ,डॉ. सुनील गिते, किरण गिते, रोहिदास गिते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही निवड होतात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत नवनिर्वाचित उपसरपंच शशिकांत गिते यांच्या निवडीचे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com