देवळालीत भाजपला धक्का

देवळालीत भाजपला धक्का

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Deolali Camp

गेल्या 20 वर्षांपासून भाजपचे (Bharatiya Janata Party) काम करताना स्थानिक नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून माजी शहराध्यक्ष शशिकांत घुगे (Shashikant Ghuge) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अखिल भारतीय ओबीसी महासभेत (All India OBC General Assembly) प्रवेश केला आहे...

देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) आगामी विधानसभा निवडणूक भाजपला (BJP)स्वबळावर लढविण्यासाठी तयारी करीत असताना देवळाली कॅम्प शहराचे माजी अध्यक्ष, युवा मोर्चा माजी जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत घुगे यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

याबाबत त्यांनी देशदूतशी बोलताना सांगितले की, शहरात भाजपचे मोजके लोक असताना पक्षवाढीसाठी खस्ता खाणाऱ्यांकडे स्थानिक नेते दुर्लक्षित करीत आहे. मंडलाच्या मीटिंगसाठीदेखील बोलाविले जात नाही.

२०१५ मध्ये कॅन्टोन्मेंट निवडणुकीत उमेदवारी मागे घेऊन पक्षवाढीसाठी सक्रीय राहिलो, मात्र पदाधिकाऱ्यांनी सतत दुर्लक्षित केल्याने आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्यासोबत इतरही कार्यकर्ते बाहेर पडणार असल्याचे घुगे यांनी सांगितले.

ओबीसी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

घुगे यांनी भाजप सोडून अराजकीय संघटना असलेल्या ओबीसी महासभेत प्रवेश केला आहे. त्यांच्यावर प्रदेश संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अॅड. रघुनाथ महाले (Adv. Raghunath Mahale) यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गोरख आखाडे, गौरव सोनार, विद्या घायतड, श्रावण देवरे, सूर्यभान गोरे, धनेश्वर शिरसाट, राजेंद्र वर्मा आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com