महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या शर्विन किसवेची निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या शर्विन किसवेची निवड

नाशिक | प्रतिनिधी

 नाशिकच्या शर्विन उदय किसवे Sharvin Uday Kisve  ह्याची १९ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र क्रिकेट संघात Maharashtra Cricket Team  निवड झाली आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित नोव्हेंबरमध्ये सुरत येथे होणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील कूच बिहार स्पर्धेसाठी Kuch Bihar competition ही निवड झाली आहे.

शर्विन डावखुरा सलामीवीर असुन संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिकादेखील निभावतो . नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध स्पर्धात शर्विन फलंदाजीत धावा करण्यात नेहमीच आघाडीवर असतो. ह्या उदयोन्मुख फलंदाजाने आता पर्यंतच्या आपल्या छोट्याशा कारकिर्दीत विविध वयोगटातील सामन्यांत जवळपास ५० धावांच्या सरासरीने १६८ डावात , १६ खणखणीत शतके व ३९ अर्धशतके झळकाविली आहेत. यष्टीरक्षक म्हणूनही १६२ सामन्यांत ८३ झेल व ६५ यष्टीचीत अशी लक्षणीय कामगिरी केली आहे. १४ वर्षे वयोगटात शर्विन ने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

कूच बिहार स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा एलिट सी गटात समावेश आहे. या गटात हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश ,छत्तीसगड , तमिळनाडु व गोवा हे इतर संघ आहेत. सदर स्पर्धेचे साखळी सामने २९ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर २०२१ दरम्यान सुरत येथे खेळविले जाणार आहेत . महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत - २९ नोव्हेंबर - गोवा, ६ डिसेंबर - छत्तीसगड, १३ डिसेंबर - तमिळनाडु, २० डिसेंबर - मध्य प्रदेश व २७ डिसेंबर - हिमाचल प्रदेश. त्यानंतर जानेवारी अखेरपर्यन्त बाद फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत.

शर्विनच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना Nashik District Cricket Association व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्विनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com