
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने शरद क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे...
महोत्सवाची सुरुवात प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे (Dilip Khaire) यांच्या हस्ते अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनाने करण्यात आली.
बक्षीस वितरण शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजन मुकेश शेवाळे, अमोल नाईक, वैभव देवरे, अमर वझरे यांनी केले होते. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ७ हजार १००, द्वितीय पारितोषिक ५ हजार १०० व तृतीय पारितोषिक ३ हजार १०० रुपये देण्यात आले.