आईच्या आठवणी सांगत सांगत नाशिकच्या तुरुंगात लिहिले गेले 'शामची आई'; वाचा सविस्तर

आजच्याच दिवशी झाली होती पुस्तक लिहिण्यास सुरुवात
आईच्या आठवणी सांगत सांगत नाशिकच्या तुरुंगात लिहिले गेले 'शामची आई'; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

‘पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे, आठवावे आणि वाटावेही’ साने गुरुजींनी Sane Guruji) पुस्तकाची अशी व्याख्या केली आहे. साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातील १९३० ते १९५० या वीस वर्षांपैकी तब्बल सहा वर्षं सहा महिने हा काळ धुळे (Dhule), नाशिक Nashik), जळगाव (Jalgaon) आणि येरवडा (yerwada) येथील तुरुंगात काढला....

याच काळात त्यांनी बरेच लेखन केले. १७ जानेवारी १९३२ ते ऑक्टोबर १९३३ हे एकवीस महिने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात होते. (Jail in nashik) तिथेच त्यांनी दररोज रात्री त्यांच्या सहकाऱ्यांना आईच्या आठवणी (Mother's memories share with his friends) सांगण्यास सुरुवात केली होती. सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर या आठवणी त्यांनी लिहून काढल्या.

याच आठवणींचा धांडोळा म्हणजे ‘श्यामची आई’ (Shamchi Aai) पुस्तक नावारूपाला आले. या पुस्तकातील ३६ रात्री साने गुरुजींनी ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी १९३३ या पाच दिवसांतल्या चार रात्रींत लिहून काढल्या. उरलेल्या नऊ रात्री मात्र त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर लिहिल्या. हे पुस्तक लिहिताना त्यातील तीन रात्री त्यांनी वगळून फक्त ४२ रात्रींचेच पुस्तक लिहिले.

तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या, हा प्रश्न कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा राहिलेला आहे. साने गुरुजींचे नाव पांडुरंग (pandurang) होते तर त्यांना पंढरीनाथ टोपण नावाने बोलले जायचे. त्यांना स्वत:ला मात्र ‘राम’ हे नाव अधिक आवडत होते. ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिताना गुरुजींनी ‘श्याम’ हे नाव घेतले.

कारण त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ (Yashoda) होते. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी याविषयी एके ठिकाणी नमूद केले आहे. पुढे ‘श्याम’ या नावानेच गुरुजींनी इतरही काही लेखन केले. ‘श्यामच्या आई’ची पहिली आवृत्ती अमळनेरच्या जगन्नाथ गोपाळ गोखले (jagannath gopal gokhale) यांनी प्रकाशित केली. त्यावर दासनवमी शके १८५७ असा उल्लेख आहे. किंमत एक रुपया इतकी आहे.

या पुस्तकाचे मुखपृष्ठही गुरुजींच्या नागेश पिंगळे या विद्यार्थ्यांने तयार केले आहे. या पुस्तकावर मात्र पां. स. साने असा उल्लेख आहे. हे पुस्तक अमळनेरहून प्रकाशित झाले असले तरी त्याची छपाई मात्र पुण्यातल्या लोकसंग्रह छापखान्यात झाली. ‘श्यामची आई’ प्रकाशित झाल्यावर काही महिन्यांनीच गुरुजींच्या ‘पत्री’ या कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. हा संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com