Nashik Crime News : गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार; संशयित ताब्यात

 Nashik Crime News : गुंगीचे औषध देऊन  विवाहितेवर अत्याचार; संशयित ताब्यात

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकावर झोपलेल्या एका विवाहित महिलेला (Married Woman) गुंगीचे औषध (Gungy Medicine) पाजून रिक्षात बसवून अज्ञातस्थळी घेऊन जात दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड भागात घडली आहे. नाशिकरोड भागात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांचा (Police) वचक कमी झाला की काय? अशी चर्चा आता परिसरात होऊ लागली आहे...

याबाबत पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुळ गुजरात (Gujarat) राज्यात राहणारी विवाहित महिला पतीपासून विभक्त झाल्याने माहेरी राहायला आली होती. आईसोबत भांडण झाल्याने ती नाशिक (Nashik) येथे राहणाऱ्या बहिणीकडे गुजरात राज्यातून मुंबई आणि मुंबई दादर येथून बुधवार (दि. २१) रोजी आली होती. त्यावेळी रात्रीचे दोन वाजल्याने ती रेल्वे स्थानकावरील फ्लॅट फार्म नं २ वर एका बाकावर बसली होती. यावेळी तिने बहिणीला एका महिलेच्या फोन वरून फोन केल्याने बहिणीने तिला सकाळी घ्यायला येते असे सांगितले. त्यामुळे पीडित महिला बाकावरच झोपली.

 Nashik Crime News : गुंगीचे औषध देऊन  विवाहितेवर अत्याचार; संशयित ताब्यात
Monsoon Update : महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास एक अनोळखी इसम तिच्याकडे आला व कुठे जायचे असे विचारून मी सोडून देतो असे सांगत बळजबरीने तिला वडापाव खायला दिला. तसेच एका रिक्षात (Rickshaw) बसवत स्थानकाबाहेरील एका मेडिकल दुकानात जाऊन काहीतरी औषध आणून तिला बळजबरीने पाजले. ते औषध पिल्यानंतर महिलेला गुंगी आल्याने त्या दोघांनी तिला चेहडी येथे पेरूच्या बागेत नेऊन आळीपाळीने अत्याचार करून त्या ठिकाणाहून पळून गेले.

दरम्यान, यानंतर पहाटेच्या सुमारास पीडित महिलेने शेजारी असलेल्या एका इमारतीमधील वाचमनला सदर घटनाक्रम सांगितला. त्यानंतर त्याने नाशिकरोड पोलिस ठाण्याला (Nashik Road Police Station) कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले असून महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

 Nashik Crime News : गुंगीचे औषध देऊन  विवाहितेवर अत्याचार; संशयित ताब्यात
मोदी सरकारविरोधात विरोधकांचा एल्गार! पाटण्यातील बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह 'हे' नेते राहणार उपस्थित
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com