नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

ब्रेंकिंग न्यूज
ब्रेंकिंग न्यूजब्रेंकिंग न्यूज

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

तालुक्यातील नागासाक्या धरणालगत (Nagasaki Dam) अवैध वेश्या व्यवसाय करणार्‍या हॉटेल गोल्डन पॅलेस (Hotel Golden Palace) याठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) आणि नांदगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत देहव्रिक्री रॅकेट उघडकीस आणले आहे.

याबाबत माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि नांदगाव पोलिसांनी (Nandgaon Police) नागासाक्या धरणालगत असलेल्या हॉटेल गोल्डन पॅलेस येथे बनावट ग्राहकास (Fake Customer) पाठवले असता त्याच्याकडून पैसे (Money) स्वीकारुन पीडित महिला अन्य साथीदार पथकाच्या जाळ्यात अडकले.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संशयित मोहम्मद अख्तर, शमीम सोनावाला, मॅनेजर सचिन इंगळे, ज्ञानेश्वर मोरे, संदिप जाधव, वाल्मिक माळी,संजय मेंगनर आणि देहविक्री (Prostitution) करणार्‍या दोन महिलांना अटक केली आहे. तसेच यावेळी पोलिसांनी (Police) संशयितांकडून रोख रक्कम रुपये ०५ हजार ७० रुपये आणि ४३ हजार रुपये किंमतीचे मोबाईल, स्प्रे, महागडे गर्भनिरोधक असा मुद्देमाल जप्त केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com