सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

कसबे सुकेणे । वार्ताहर Kasbe sukene

येथील ग्रामपालिकेने (grampalika) गावातील सांडपाण्यासाठी (Sewage) जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे (water purification project) हे पाणी पुनर्वापरासाठी (water recycling) सुमारे 80 लाखांचा प्रस्ताव शासनाला सादर केला असल्याची माहिती सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनराज भंडारे, ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे यांनी दिली आहे.

कसबे सुकेणे ग्रामपालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत अनेक प्रकल्प सुरू केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत येथील बाणगंगा नदी (Banganga river) शुद्धीकरण प्रकल्प असून गावातील सांडपाणी जे बाणगंगा नदीला सोडले जाते त्याऐवजी त्या पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याचा ग्रामपालिकेचा मानस आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

असा प्रकल्प राबवणारे तालुक्यातील कसबे सुकेणे पहिले गाव ठरणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कसबे सुकेणे ग्रामपालिकेला मागील वर्षी 8 वे मानांकन तर राज्यामध्ये 28 वे मानांकन प्राप्त झाले होते. चालू वर्षी देखील ग्रामपालिकेने पुन्हा माझी वसुंधरा अभियानात भाग घेतला असून त्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवले जात आहे.

याच अभियानांतर्गत कसबे सुकेणे गावामध्ये वेगवेगळ्या फळांची व बहुउद्देशीय झाडांची लागवड केली जात असून त्यासाठी समाज सुधारक पुढे येत आहे. हे प्रकल्प यशस्वी राबवण्यासाठी सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनराज भंडारे, ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य छगन जाधव, रमेश जाधव,

सुहास भार्गव, बाळू कर्डक, किशोर कर्डक, सोमनाथ भागवत, छबू काळे, अतुल भंडारे, शिल्पा जाधव, ज्योती भंडारे, सरला धुळे, मनीषा भंडारे, सविता जाधव, सुरेखा औसरकर, आरती कर्डक, छाया गांगुर्डे, अबिदा सय्यद आदींसह कर्मचारी प्रयत्नशील आहे. पाण्याचे महत्व ओळखून पाणी बचती बरोबरच वाया जाणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करून ते उपयोगात आणण्याच्या नियोजनाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com