आयटीआय
आयटीआय
नाशिक

नाशिकमध्ये आयटीआयच्या साडेसात हजार जागा

एक आॅगस्टपासून प्रवेश प्रक्रिया

Bharat Pagare

नाशिक | प्रतिनिधी

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे.

या प्रवेश प्रकियेचे अर्ज https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. नाशिक विभागात खाजगी आणि सरकारी अशा २१५ आयटीआयमध्ये २९ हजार ५०० जागा उपलब्ध असून जिल्ह्यात ७ हजार ८१२ जागा उपलब्ध आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय कधी सुरु होतील. याबाबत सरकारच्या निर्णयायानुसार माहिती जाहीर करण्यात करण्यात येणार आहे.

आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५५ इतकी आहे.

आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.

खाजगी आयटीआयची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार आहे. शासकीय आणि खाजगी आयटीआयची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

महत्वाच्या तारखाऑनलाइन अर्ज करणे : १ ते १४ ऑगस्ट २०२०पहिल्या फेरीसाठी प्राधान्य : २ ते १४ ऑगस्टप्राथमिक गुणवत्ता यादी : १६ ऑगस्ट सकाळी ११ वाजताहरकत / बदल नोंदणी : १६ आणि १७ ऑगस्टअंतिम गुणवत्ता यादी : १८ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजतापहिली प्रवेश फेरी : २० ऑगस्टदुसरी प्रवेश फेरी : ३० ऑगस्टतिसरी प्रवेश फेरी : ७ सप्टेंबर चौथी प्रवेश फेरी : १५ सप्टेंबरनवीन प्रवेश : १ ते १९ सप्टेंबर

नाशिक विभागात ६८ शासकिय आयटीआय असून त्यात १४ हजार ६२४ जागा आहेत. तर, १४७ खासगी आयटीआयमध्ये १४ हजार ८७६ जागा असून २१५ संस्थांत एकूण २९ हजार ५०० जागा आहेत. जिल्ह्यासाठी २१ शासकिय अायटीआयमध्ये ५ हजार २२४ जागा असून खासगीमध्ये २८ संस्थांतून २ हजार ६४८ जागा उपलब्ध आहेत

Deshdoot
www.deshdoot.com