करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

सिन्नर तालुक्यात सात रुग्णांचा मृत्यू

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी - डॉ. बच्छाव

Abhay Puntambekar

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील ५५ वर्षीय रुग्णाचा नाशिक येथील डॉ. वसंत पवार रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे ‘करोना’ने मृत्यू झालेल्या तालुक्यातील रुग्णांची संख्या सात झाली आहे.

बारागाव पिंप्री येथील या रुग्णाला जुना कुठलाही आजार नव्हता. ३ जुलैदरम्यान त्यांना कोविडसदृश लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे त्यांनी औषधोपचार घेतला.

त्यानंतरही फरक न पडल्याने ८ तारखेला आडगाव येथील डॉ. पवार हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वीच ‘करोना’चा संसर्ग झाल्याचा त्यांचा अहवाल आला असल्याने करोनामुळे मृत्यू म्हणूनच त्यांची नोंद होईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी स्पष्ट केले. या रुग्णाला जुना कुठलाही आजार नव्हता.

करोना बाधिताचा मृत्यू होतो हा समज बारागाव पिंप्रीच्या रुग्णाच्या मृत्यूमुळे खोटा ठरला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. बच्छाव यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com