ओळखपत्र
ओळखपत्र
नाशिक

सात लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र

निवडणूक शाखा : थेट घरपोच देणार

Kundan Rajput

नाशिक । Nashik

निवडणूक आयोगानेही आता डिझिटलायजेशनकडे वाटचाल केली असून मतदारांना रंगीत अोळखपत्र असलेले स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. जिल्ह्यात मतदारांची संख्या साधारणत: ५५ लाख आहे. त्यापैकी सात लाख रंगीत मतदार अोळखपत्र तयार झाले आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांना थेट घरपोच हे अोळखपत्र पाठवले जाणार आहे. त्यामुळे लवकरच मतदारांच्या हाती स्मार्ट अोळखपत्र असणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने मागील वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कलावधीत मतदारांसाठी नवीन रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम सुरू केली होती. मतदानासाठी मतदाराचा पुरावा म्हणून छायाचित्र ओळखपत्र महत्त्वाचे असते. मतदारांकडे यापूर्वीच निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र असले तरी पूर्वीच्या ओळखपत्रचा गैरवापर अधिक होत होता.

संगणकीय आणि कृष्णधवल ओळखपत्र असल्याने बनावट ओळखपत्र तयार करून त्याचा निवडणुकीत गैरवापर करण्याचा प्रकार सातत्याने समोर आल्याने निवडणूक आयोगाने सुरक्षित आणि रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार नवमतदारांना तसेच ज्यांनी ओळखपत्रतील बदलासाठी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी नवीन प्रकारचे मतदार छायाचित्र ओळखपत्र तयार करण्यात आलेले आहेत.

निवडणुकीच्या काळातदेखील काही मतदारांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन ओळखपत्रे देण्यात आलेली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात याबाबत अधिक जनजागृती करण्यात आल्याने नवीन मतदान ओळखपत्रंची अधिक मागणी नोंदविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 7,59,7क्क् मतदारांना रंगीत छायाचित्र ओळखपत्र मिळणार आहे.

आता आकर्षक रंगीत पॉलिमेरायङिांग विनाइकल क्लोराइड ओळखपत्र देण्यात येत आहे. ओळखपत्रसाठी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्रची प्रक्रिया सुरू होते.

विधानसभानिहाय रंगीत मतदान ओळखपत्र

नांदगाव - ७४३८१

मालेगाव (मध्य) - ४३०८९

मालेगाव (बाह्य) - ४७४१३

बागलाण - ६१०६५

कळवण - ५४७०१

चांदवड/देवळा - ६९८०५

येवला - ६०६६६

सिन्नर - ५२९१५

निफाड - ६३५०९

दिंडोरी / पेठ - ७०१०

नाशिक(पूर्व) - २०८८०

नाशिक (मध्य) - २६७७९

नाशिक (पश्चिम) - १३०९६

देवळाली - ४८५४८

इगतपुरी / त्र्यंबकेश्वर - ५१३१५

एकूण - ७५९७००

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com