
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दि. १ मार्च ते ७ मार्च २०२३ दरम्यान चंदिगड येथे पंजाब विद्यापीठाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ रोईंग स्पर्धेसाठी नाशिकच्या water's Edge बोट क्लबवर सराव करणाऱ्या सात खेळाडूंची विविध विद्यापीठाअंतर्गत निवड करण्यात आली आहे....
निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात
पुरुष : कॉक्सल्स फोर प्रकार :अनिकेत तांबे, ओंकार राऊत, गणेश माळी, रोशन तांबे.
महिला : सिंगल सक्ल : पुनम तांबे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संघात
पुरुष : सिंगल सक्ल : अनिकेत कानमहाले.
महिला : सिंगल सक्ल : सृष्ठी जाधव
या खेळाडूंना बोट क्लबचे प्रशिक्षक पुजा जाधव, अविनाश देशमुख, राहुल काकड यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंना बोट क्लबचे अध्यक्ष माजी नगरसेवक विक्रांत मते यांनी शुभेच्छा देताना खेळाडूंनी आपल्या सरावाच्या जोरावर स्पर्धेत पदक मिळून आपल्या महाविद्यालयाचे व बोट क्लबचे नाव उज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोट क्लबचे महाराष्ट्र शासन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.