सेवाग्राम एक्स्प्रेसला 1 जुलैपासून नांदगाव येथे थांबा

सेवाग्राम एक्स्प्रेसला 1 जुलैपासून नांदगाव येथे थांबा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

रेल्वे प्रशासनातर्फे दुसर्‍या अनलॉकनंतर येत्या 1 जुलैपासून सेवाग्राम एक्स्प्रेस ( Sevagram Express ) सुरू करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने पत्रकाव्दारे जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, काशी, कामायनी, महानगरी, जनता, झेलम, कुशीनगर, एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावरील थांबे अद्याप बंदच असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे सदर एक्स्प्रेस रेल्वेंचे थांबे पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काशी, कामायनी, महानगरी, जनता, झेलम, कुशीनगर, एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावरील थांबे पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी नांदगावसह परिसरातील गावातील प्रवाशांची बर्‍याच दिवसापासून आहे. नांदगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. नांदगाव रेल्वे स्थानक ( Nandgaon Railway Station ) हे नावापुरते रेल्वे स्थानक म्हणून ओळख राहणार आहे काय? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. नांदगाव तालुक्यातील नागरिकांना मुंबई, नाशिक येथे जाण्यासाठी एकमेव सेवाग्राम एक्स्प्रेस रेल्वे गाडी रेल्वे प्रशासनाने 1जुलैपासून सुरू करण्यात आल्याने नांदगावकरांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावरील काशी, कामायनी, झेलम, महानगरी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी केद्र सरकारमधील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा. रेल्वेकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. करोनाची परिस्थिती सध्याच्या घडीला कमी झाल्याचे चित्र असून वरील रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवाशांतर्फे केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com