पाणी योजनांसाठी सौर प्रकल्प उभारा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला खा. गोडसे यांची सूचना
पाणी योजनांसाठी सौर प्रकल्प उभारा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील अनेक गावांच्या समुहांचा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांमध्ये समावेश झालेला असून जमा होणारी पाणीपट्टी आणि वीजबिले यात मोठी तफावत रहात आहे. प्रत्यक्ष वीजबिलांची Electricity bill रक्कम खूपच मोठी असते तर त्या तुलनेत जमा होणारी पाणीपट्टीची Water Bill रक्कम खूपच कमी असते.

यामुळे पाणीपुरवठा समितीला वीजबिले भरणे शक्य होत नसल्याने वीजबिल थकित होवून गावाच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. यावर पर्याय म्हणून गाव शिवारातील मोकळ्या जागेवर सोलर प्लांट Solar Plant उभारण्यात यावेत, अशी सूचना खा. गोडसे MP Hemant Godse यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला Maharashtra Jeevan Pradhikarana केली आहे.

सिन्नर तालुक्यातील मनेगावसह तेवीस गाव पाणीपुरवठा योजना, बारागाव पिंप्रीसह सात गाव, ठाणगावसह सहा गाव, वावीसह अकरा गाव, मीठसागरे पंचाळेसह बारा गाव, नायगावसह दहा गाव, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना या गावाच्या समुहांचा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत समावेश झालेला असून पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष कार्यान्वित आहेत. वीज मंडळाकडून येणारे अव्वाच्या सव्वा वीजबिले आणि पाणीपट्टी पोटी प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम यामध्ये खूपच तफावत आहे. नळधारकांकडून पाणीपट्टी भरण्यास हलगर्जीपणा होत असल्याने पाणीपुरवठा समितीला वेळेत आणि संपूर्ण वीजबिले भरणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस थकित वीजबिलांची रक्कम वाढत जाते व वीजबिले थकल्याने वीजमंडळाकडून पाणीपुरवठा योजनेचा विद्युतपुरवठा खंडित होतो.

तालुक्यातील विविध गावांमधून याबाबत नेहमी तक्रारी येत असतात. त्यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी खा. गोडसे यांनी प्राधिकरणाला विशेष पत्र धाडले आहे. भरमसाठ वीजबिलांना पर्याय म्हणून पाणीपुरवठा असणार्‍या गाव शिवारातील जागेवर सोलर प्लांट उभारावेत अशी सूचना खा. गोडसे यांनी पत्रात प्राधिकरणाला केली आहे.

ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सोलर प्लांटच्या प्रकल्पांना निधी व प्रशासकीय मान्यतेसाठी अडचणी निर्माण झाल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा असेही खा. गोडसे यांनी पत्रात म्हटले आहे. खा. गोडसे यांच्या सोलर प्लांट उभारण्याविषयीच्या सूचनांची दखल घेत प्राधिकरणाने लगेचच प्रत्यक्ष कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. प्राधिकरणाने आज मनेगाव व बारागाव पिंप्री येथील पाणीपुरवठा समितीकडून सोलर प्लांट उभारण्याच्या जागेसंदर्भातील प्रस्तावाची मागणी केली आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलावर पर्याय म्हणून खा. गोडसे यांनी सोलर प्लांटचा पर्याय अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com