हरसूल ग्रामीण रुग्णालयात खाजगी डॉक्टरांकडून सेवा

हरसूल ग्रामीण रुग्णालयात खाजगी डॉक्टरांकडून सेवा

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

सध्या सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. प्रत्येक ठिकाणी आरोग्य यंत्रणा २४ कार्यरत आहे. त्यामुळे लवकरच करोनाला हद्दपार करण्यात यंत्रणेला यश येईल यात शंका नाही.

त्र्यंबकेश्वर शहरातही आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा जोमाने काम करीत आहे. अनेक सेवाभावी संस्था, तरुण या मोहिमेत सहभागी झाले आहेत. अनेक दानशूर मंडळीं कोरोना कक्षाला मदत करताना दिसत आहेत.

दरम्यान नुकत्याच स्थानिक नागरिकांनी कोविड मदत कक्षाला सहा ऑक्सीजन टाक्या, रुग्णांना लागणारे बेडशीट व अन्य साहित्य दिले आहे. ही समिती 6 एप्रिल पासून कार्यरत आहे.

तालुक्यातील हरसूल ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयाचे डॉक्टर नर्स आजारी असल्याने हरसुलचे खाजगी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची सेवा करीत आहे. बाह्य रुग्ण विभागात मोठी मदत यामुळे झाली आहे. खाजगी डॉक्टर कुटके, पाटील, वाघेरे, पवार, निकम, माळी, शेळके, सूर्यवंशी, सोनवणे आशा नऊ जणांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com