'या' विभागातील लिपिकांसाठी सेवा हक्क प्रशिक्षण

'या' विभागातील लिपिकांसाठी सेवा हक्क प्रशिक्षण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Works Department) लिपिक सेवाप्रशोत्तर सत्राचे (Clerical Post-Service Session) प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (Maharashtra Public Service Rights Act 2015) अंतर्गत प्रशिक्षण शिबीर (Training camp) सेवा हक्क आयोगामार्फत आयोजित करण्यात आले होते.

नाशिक विभागाच्या सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी (Service Rights Commissioner Chitra Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील नागरिकांना पारदर्शक पध्दतीने कार्यक्षमरित्या आणि विशिष्ट कालमर्यादेत अधिसूचित सेवा (Notified Services) ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या प्राप्त व्हाव्यात, म्हणून शासनाने 2015 साली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (Maharashtra Public Service Rights Act) हा महत्वकांशी कायदा अंमलात आणला.

या कायदयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता त्यातील तरतुदींची सखोल आणि परिपूर्ण माहिती सदर कायदयांची अंमलबजावणी करण्याऱ्या अधिकाऱ्यांना असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सेवा हक्क आयुक्त नाशिक विभाग चित्रा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Works Department) लिपिक सेवाप्रशोत्तर सत्राचे प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत प्रशिक्षण शिबीर आयोगामार्फत आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत मुलभूत कायदयांची माहिती देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com