वणव्यांची मालिका विझता विझेना

वणव्यांची मालिका विझता विझेना

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) मातोरी-मखमलाबाद (Matori-Makhmalabad) पट्ट्यातील सुळा डोंगराच्या पश्चिम-दक्षिणेस वणवा पेटला असता जीव धोक्यात टाकून पर्यावरणप्रेमींनी विझवला. मात्र ही वणव्याची मालिका संपता संपेना त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे...

वणवा पेटण्याच्या घटना सातत्याने घडत असून रामशेज (Ramshej), ब्रम्हगिरी (Brahmagiri), मायनापाठोपाठ आता मातोरी भागातील गायरान वनक्षेत्र तसेच पुन्हा मखमलाबाद-मातोरी भागात सुळा डोंगराच्या पश्चिम-दक्षिण भागाच्या वनक्षेत्रात वणवा पेटला.

ही माहिती मिळताच शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, दऱ्यादेवी पर्यावरणाचे भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, प्रदीप पिंगळे, विकास काकड, जितेंद्र साठे, वृक्षवल्लीचे आशिष प्रजापती, वेदांत पटेल यांनी मोठ्या परिश्रमातून हा वणवा विझवला.

वणव्यात मोठया प्रमाणात होणारे जैवविविधतेचे नुकसान टळले. नाशिक जिल्ह्यात महिनाभरात डोंगर, टेकड्यांवरील वनक्षेत्र, गायरान, वन्यजीव राखीव क्षेत्र व गडकोटांच्या भूमीत वणवा लागत आहे. वणवा लागण्याच्या घटनांची मालिका सातत्याने सुरू असून वणवा मानवी दुष्टकृत्याने लागत आहे.

मात्र वनवा लावणारे गुन्हेगार मोकाट आहे. याबाबतीत वन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या नावे निवेदन दिले आहे.

तसेच मखमलाबाद येथील तरुण शेतकरी विकास काकड (Vikas Kakad) याने सुळा डोंगराच्या पायथ्याला वनक्षेत्रात वणवा लागल्याची माहिती शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेला दिली. संस्थेच्या सदस्यांनी तातडीने संबंधित वणवा लागलेल्या क्षेत्रात अंधारात ओले बारदाने, झाडाच्या फांद्या, पाणी घेऊन पायवाटेने त्या वनक्षेत्रात जाऊन वणवा लागलेल्या जमिनीवर ओले बारदाने झोडपून वणवा विझवण्यासाठी कसोटीचे परिश्रम घेण्यात आले.

वनविभागास (Forest Department) आग (Fire) विझवल्याची माहिती दिली. वनविभागाने तातडीने वणवा लावणाऱ्या अज्ञातांवर गुन्हे नोंदवावे. वनविभागाचे वणवा मुक्त अभियान प्रत्यक्षात आणण्यासाठी वणवा रोखणारी यंत्रणा, रेस्क्यू फोर्स व हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ (Ram Khurdal) यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.