नाशिकरोडला अपघाताची मालिका सुरूच; वाहनाच्या धडकेत दोन ठार

अपघात | Accident
अपघात | Accident

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिकरोड परिसरात अपघाताची (Accident) मालिका सुरूच असून वाहनाच्या धडकेत दोन दुचाकी चालक ठार झाले आहे. याप्रकरणी उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने अपघात होत आहे. उपनगर परिसरात तीन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले होते. त्यानंतर नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे बस पेटून अपघातात दोन जण ठार तर सत्तावीस जण जखमी झाले होते.

त्याचप्रमाणे सिन्नर येथील मोहदरी घाटात सुद्धा शुक्रवारी अपघात होऊन पाच विद्यार्थी ठार झाले ही घटना ताजी असतानाच उपनगर व नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वाहनांच्या धडकेत दोन जण ठार झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वडनेर पाथर्डी रस्त्यावर सैनिक कॉलनी परफेक्ट गॅरेज जवळ एका चार चाकी वाहनाच्या धडकेत दयाल विशनदास पर्यानि वय 61 हे ठार झाले पर्यानि हे आपल्या प्लेजर स्कूटर वरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना वडनेर पाथर्डी रस्त्यावर धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

त्यानंतर त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला .सदर घटने प्रकरणी उपनगर पोलिसांनी अज्ञात वाहन धारका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी संजय दयाल पर्यानि यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महाजन हे करत आहे.

तर दुसरा अपघात जेल रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ झाला नांदूर नाक्याकडून बिटकोकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात श्रीकांत विजय साबळे (45 रा, नंदनवन रो हाऊस टाकळी रोड, जेल रोड, नाशिकरोड) हे ठार झाले.

साबळे हे आपल्या दुचाकी गाडीवरून जेलरोड कॅनॉल मार्गे जात होते याच दरम्यान त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली त्यात ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर पोलिसांनी वाहनचालकाचा शोध घेतला असून पोलिसांना गाडीचा नंबर व वाहन चालक याबाबत माहिती मिळाली आहे. या घटनेप्रमाणे नाशिकरोड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप हे करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com