संवेदनशील घोटीत भोंग्यांचे आवाज झाले कमी; हिंदू मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन

संवेदनशील घोटीत भोंग्यांचे आवाज झाले कमी; हिंदू मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन

घोटी | वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात (Ghoti City Tal Igatpuri) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena), घोटी पोलीस (Ghoti Police) व दोनही मशिद ट्रस्टच्या वतीने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आव्हानाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत समन्वयाने पहाटेची अजानाचा आवाज कमी करण्यात आला....

उर्वरित अजान देतांना प्रार्थना स्थळाच्या आत भोंग्यांचा आवाज ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली. देशभरात अनेक जातीयवादी दंगे यापूर्वी झाले मात्र घोटी शहराने (Ghoti) कायम हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.

मनसेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे (Sandip Kirve) यांच्या नेतृत्वाखाली यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे (Ghoti Police Station) सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, जामा मजिदचे ट्रस्टी डॉ. युनूस रंगरेज, शाही मजिदचे ट्रस्टी मुस्ताक पानसरे यांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

तसेच मनसेचे प्रताप जखेरे, निलेश जोशी, मनोज गोवर्धने, राजेश राखेचा, अर्जुन कर्पे, ऋषी शिंगाडे, निलेश बुधवारे, शुभम भगत, अमोल क्षीरसागर, बापू काळे, सचिन छत्रे, पिंटू गतिर आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी दोन्ही समाजाचे ऐक्याचे दर्शन पाहून अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com