ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ. कुसुमताई गायकवाड यांचे निधन

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शोक व्यक्त
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ. कुसुमताई गायकवाड यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व मनमाड शहराच्या माजी नगराध्यक्ष कॉ. कुसुमताई माधवराव गायकवाड (Kusumtai Madhavrao Gaikwad) यांचे आज वृद्धपकाळाने दु:खद निधन झाले आहे...

कॉ. कुसुमताई माधवराव गायकवाड यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी त्यांचे पती स्व. कॉ. माधवराव गायकवाड यांच्या सोबतीने आपले संपूर्ण आयुष्य देशहित आणि जनहितासाठी खर्ची केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कलापथकात त्यांनी महत्वपूर्ण काम केले.

या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी समाजात जनजागृती करण्याची अतिशय महत्वाची भूमिका बजावली. स्व. माधवराव गायकवाड यांच्या सोबत त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात देखील सहभाग घेऊन लढा दिला. स्व. माधवराव गायकवाड यांच्या विचाराचा वारसा व कार्य त्यांनी नेटाने पुढे नेला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

कॉ. कुसुमताई गायकवाड यांनी मनमाड शहराचे नगराध्यक्षपद भूषविले. मनमाड शहराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आपल्या अलौकिक कार्यातून त्यांनी अनेक चळवळीचे कार्यकर्ते घडविले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ. कुसुमताई गायकवाड यांचे निधन
शेततळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू

त्यांच्या निधनाने एक आदर्श लोकप्रतिनिधी व लढवय्ये महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. नाशिक जिल्हा एका आदर्श लढवय्या महिला नेतृत्वाला कायमचा मुकला आहे. मी व माझे कुटुंबीय गायकवाड कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com