नवीन नाशकात ज्येष्ठ नागरिकावर धारदार शस्त्राने वार

नवीन नाशकात ज्येष्ठ नागरिकावर धारदार शस्त्राने वार

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

माऊली लॉन्स परिसराजवळील Mauli Lawns Area इंद्रायणी मेडिकल Indrayani Medical वर एका माथेफिरूने दगडफेक करत सैन्यदलातील सेवानिवृत्त एका ज्येष्ठ नागरिकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नुकतीच काही वेळापूर्वी घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की माऊली लॉन्स परिसरा जवळ असलेल्या नवीन नाशिक प्रभाग सभापती सुवर्णा मटाले यांच्या संपर्क कार्यालय शेजारी इंद्रायणी मेडिकल या ठिकाणी रात्रीच्या वेळी जगदीश गांगुर्डे नामक युवकाने दगडफेक सुरू केली.

यादरम्यान सैन्यातून सेवानिवृत्त Retired from the army असलेले ज्येष्ठ नागरिक सयाजी साळुंके यांनी त्यांच्या घरासमोरील मेडिकलवर दगडफेक होत असतानाचे बघून सदर गांगुर्डे याला धरत त्याला पकडले असता गांगुर्डे याने ज्येष्ठ नागरिक यांच्यावर धारदार शस्त्राने वार Strike with a sharp weapon केले.

दरम्यान या ठिकाणी जमलेल्या जमावाने गांगुर्डेला बेदम मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यामध्ये Ambad police Station गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान सैन्य दलातील निवृत्त साळुंके यांच्यामुळे मेडिकलवर होणारी दगडफेक थांबल्यामुळे त्यांचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com