किसान रेल्वेद्वारे शेतमाल पाठवा : जगताप

किसान रेल्वेद्वारे शेतमाल पाठवा : जगताप

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

देवळाली (Devalali) ते मुझफ्फरपूर (Muzaffarpur) ही किसान रेल्वे पार्सल गाडी (Kisan Railway Parcel Train) पुन्हा सुरू झाली असून शेतकरी (farmers) व व्यापारी (Merchant) बांधवांनी आपला शेतीमाल (Agricultural goods) कमी वेळेत परराज्यात पाठविण्यासाठी किसान रेल्वेला (Kisan Railway) प्राधान्य द्यावे असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee) सभापती सुवर्णा जगताप (Chairperson Suvarna Jagtap) यांनी केले आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी (farmers) बांधव व व्यापारी वर्गास त्यांचा शेतीमाल कमी वेळेत परराज्यात पाठविण्यासाठी किसान रेल्वे (Kisan Railway) गाडी काही दिवसांपुर्वी रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) बंद करण्यात आली होती. परंतु परीसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांची परराज्यात शेतमाल पाठविण्यासाठी होत असलेली गैरसोय विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले होते.

त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने शेतकरी व व्यापारी वर्गाच्या हितासाठी देवळाली ते मुझफ्फरपूर ही किसान रेल्वे पार्सल गाडी पाच महिन्यांनतर पुन्हा सुरू केली असुन सदर रेल्वे गाडीस लासलगाव स्थानकावर दर मंगळवार व शनिवार या दिवशी थांबा राहील. तसेच सदर रेल्वे गाडीने जास्तीत जास्त शेतकरी व व्यापारी त्यांचा शेतीमाल परराज्यात पाठवावा याबाबत चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी शेतकरी, व्यापारी व रेल्वेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) संपन्न झाली.

या बैठकीत रेल्वेकडून भाडे दर कमी करणे, अनुदान देणे, रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात विद्युत पुरवठा देणे आदी सुविधांची मागणी करण्यात आली. तसेच रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सदर गाडीस असलेले दर, गाडीचे वेळापत्रक व रेल्वे बोर्डाकडुन उपलब्ध असलेल्या सुविधा आदींची माहिती देऊन किसान रेल्वे पार्सल गाडीद्वारे परराज्यात आपला शेतीमाल पाठविण्यासाठी शेतकरी व व्यापारी वर्गास काही अडचणी असतील तर त्या लासलगाव रेल्वे स्टेशनचे (Lasalgaon Railway Station) मुख्य पार्सल तथा बुकींग पर्यवेक्षक व्ही.बी. जोशी (Booking Supervisor V.B. Joshi) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

याप्रसंगी बाजार समिती ज्येष्ठ पंढरीनाथ थोरे, व्यापारी सदस्य नंदकुमार डागा, सचिव नरेंद्र वाढवणे, रेल्वेचे अधिकारी एस.के. पाठक, कैलास नवपाल, बी.एल. मिना, विवेक भालेराव, डी.जे. पांडेय, व्ही.बी. जोशी, कांदा व्यापारी ओमप्रकाश राका, सौरभ जैन, बाळासाहेब दराडे, प्रवीण कदम,ओम चोथाणी, क्षितीज जैन, अजय ठक्कर, दत्तु खाडे, धान्य व्यापारी सागर थोरात, ज्ञानेश्वर गांगुर्डे, भाजीपाला व्यापारी देशमुख, संजय साळुंके, नंदु जाधव, भगवान सरोदे, मच्छींद्र काळे, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, लिलाव प्रमुख सुनील डचके, पंकज होळकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com