कार्यकारी अभियंत्यांना सक्तिच्या रजेवर पाठवा: आमदार खोसकर

कार्यकारी अभियंत्यांना सक्तिच्या रजेवर पाठवा: आमदार खोसकर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

इगतपुरी तालुक्यातील (igatpuri taluka) विविध कामांना 31 मार्च 2022 रोजी प्रशासकीय मान्यता (Administrative approval) मिळालेल्या असताना देखील

जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) बांधकाम विभाग (Department of Construction) क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज (Executive Engineer Surendra Kankerej) यांनी कार्यारंभ आदेश देण्यास विलंब केल्यामुळेच या कामांना स्थगिती मिळाली.

असा आरोप करत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांची भेट घेऊन कंकरेज यांना सक्तिच्या रजेवर (forced leave) पाठवण्याची मागणी केली आहे. ग्रामविकास विभागाची (Rural Development Department) पाच कोटी रुपयांची कामे रद्द झाल्यानंतर आता आदिवासी उपयोजनांसह डोंगरी विकास कार्यक्रमाच्या कामांनाही स्थगिती मिळाल्यामुळे आमदार खोसकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

बुधवारी (दि.९) त्यांनी मित्तल यांची भेट घेत याबाबत लेखी पत्रही देऊ असे सांगितले. यामुळे त्यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याची भूमिका सीईओ मित्तल यांनी घेतली आहे. राज्य सरकारने (state government) विकास कामांना स्थगिती (Suspension of development works) दिल्यामुळे आमदारांची कोट्यवधींची कामे रखडली आहेत. यात आमदार खोसकर यांना आदिवासी उपयोजनेतून घोटी येथे 50 लाख रुपयांतून अभ्यासिका उभारणे व सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी 90 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे.

याच योजनेतून इगतपुरीत 90 लाख रुपयांचे सांस्कृतिक भवन बांधण्यात येणार आहे. या कामांना 31 मार्च 2022 रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या असताना कार्यकारी अभियंत्यांनी कार्यारंभ आदेश देण्यास विलंब केल्यामुळे या कामांना स्थगिती मिळाली.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत (School Nutrition Scheme) महिला व बालकल्याण विभागाकडून (Department of Women and Child Welfare) 10 अंगणवाड्यांचे बांधकाम असेल किंवा 5 ग्रामपंचायतींच्या इमारती, या सर्व कामांना विलंब केल्याचे आमदार खोसकर यांनी सीईओ मित्तल यांना सांगितले. त्यामुळे कार्यकारी अभियंता कंकरेज यांना सक्तीच्या रजेवर पाठवा किंवा त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करा, अशी भूमिका घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com