नाशिक | Nashik

‘नाशिक-पुणे सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे’ प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह नगर जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे.

‘महारेल’कडून प्रस्ताव

महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) राज्यासाठीचा रेल्वे प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास पुण्याहून मुंबईला एक तासात पोहचता येणार आहे.

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण करण्यात आले.

या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, चेतन तुपे, सदाशिव लोखंडे, डॉ. किरण लोहमटे, सरोज आहिरे उपस्थित होते.

‘पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.’’

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

२३५ किलोमीटर लांबीचा लोहमार्ग

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मार्ग जाणार

रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग २५० किलो मीटरपर्यंत वाढविणार

वेळेसह इंधनाची बचत, त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प

पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी

१८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित

प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा